आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाच वर्षीय चिमुरडीवर तरुणाचा बलात्कार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - सर्वत्रगणेश विसर्जनाची धूम असताना नांदूरनाका परिसरातील एका पाच वर्षीय चिमुरडीवर ३४ वर्षीय नराधमाने शौचालयात नेत पाशवी बलात्कार करत जिवे मारण्याचा प्रयत्न केला. बुधवारी (दि. १४) सायंकाळी ६.३० वाजता रामदास जॉकीनगर, औरंगाबादरोड येथे हा निर्दयी प्रकार घडला. अर्धा तास या चिमुरडीवर अत्याचार सुरू होते. आडगाव पोलिसांनी या प्रकरणी तत्परता दाखवत संशयितास गुन्हा दाखल होण्यापूर्वीच ताब्यात घेत अटक केली. सोशल मीडियावर मात्र सामाजिक शांतताभंग करण्याचे प्रकार सुरू असून, या सर्व प्रकारांवर पोलिस लक्ष ठेवून आहे. पोलिसांनी दिलेली माहिती आणि पीडित मुलीच्या आईने पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार पीडित मुलगी घराबाहेर खेळत असताना संशयित बंटी उर्फ सचिन हिरामण पाटील (वय ३४, रा. रामदास जॉकीनगर, औरंगाबादरोड, नांदूरनाका) याने मुलीचे तोंड दाबून सुलभ शौचालयात नेत तिच्यावर पाशवी बलात्कार केला. तिच्या तोंडाला अंगाला चावे घेत जखमी केले. आरडाओरड करत असताना तिच्या तोंडात थुंकला. तुझ्या आईला आणि पोलिसांना काही सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. अर्धा तासाने मुलीचा शोध घेतला असता शौचालयातून ती रडत बाहेर आली. तिच्या चेहऱ्यावर चावल्याचे निशाण आणि ओल्या कपड्यांमुळे मुलीसोबत काही तरी गैरप्रकार घडल्याचा संशय आला. रक्ताने माखलेल्या कपड्यासह या मुलीला उचलून मातेने अाडगाव पोलिस ठाण्यात धाव घेतली. वरिष्ठ निरीक्षक संजय सानप यांनी तत्काळ जखमी मुलीस जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून माहिती घेत त्याच रात्री संशयिताच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला. दरम्यान, या प्रकरणाला काही संघटनांनी जातीय रंग देण्याचा प्रयत्न केला. दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. सोशल मीडियावर या प्रकाराची चर्चा सुरू आहे.

सोशल मीडियावर अफवा : एकादलित मुलीवर अत्याचार झाल्याची अफवा सोशल मीडियावर पसरल्याने जातीय तेढ निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पीडित मुलगी दलित समाजाची नसल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
अफवांवर नजर
^सोशल मीडियावर अफवा पसरवून दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रकार सुरू आहे. या समाजकंटकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. गुन्ह्यातील संशयितास तत्काळ अटक केली अाहे. -लक्ष्मीकांत पाटील, पोलिस उपआयुक्त, परिमंडळ
बातम्या आणखी आहेत...