आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rare Coins, Stamp, Ticket Exhibition News In Marathi

दुर्मिळ नाणी, टपाल तिकिटांचे प्रदर्शन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - इंदिरानगर येथील अजय मित्रमंडळ आणि कलेक्टर्स सोसायटी ऑफ न्युमिसमॅटिक अ‍ॅण्ड रेअर आयटेम्स् यांच्या संयुक्त विद्यमाने चार्वाक चौक परिसरातील अजय मित्रमंडळ हॉलमध्ये दुर्मिळ वस्तू, नाणी, नोटा, टपाल तिकिटे आणि जुन्या दुचाकी व चारचाकी वाहनांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे.

स्व. सिद्धेश्वर रावजी वाघ यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दि. 26, 27 जुलै रोजी हे प्रदर्शन भरविण्यात आले असून, आमदार वसंत गिते व महापौर अ‍ॅड. यतिन वाघ यांच्या उपस्थितीत या प्रदर्शनाचे उद्घाटन होईल. भारतीय संस्कृतीची जपवणूक व्हावी आणि आताच्या पिढीला इतिहास व परंपरांची माहिती व्हावी, या उद्देशाने हे प्रदर्शन भरविण्यात आले असून, नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन नगरसेविका डॉ. दीपाली कुलकर्णी, यशवंत निकुळे आणि अजय मित्रमंडळाचे प्रमुख सचिन कुलकर्णी यांनी केले आहे.