आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘ओखी’मुळे आवक घटल्याने कांद्याचे दर हजार रुपयांनी वाढले, पावसामुळे शेतकऱ्यांपुढे संकट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकरोड- ओखी चक्री वादळामुळे दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण पावसामुळे द्राक्ष, कांदा, टोमॅटो, डाळिंबासह भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले. कांदा खराब होऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी तो सुरक्षितस्थळी हलविल्याने बुधवारी बाजार समितीमध्ये कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक घटली. त्यामुळे कांदा दरात एक हजार रुपयांनी वाढ झाली. भाव 3 हजार ३०० तर 3 हजार ८०० रुपयांपर्यंत गेले होते. 


कांदा निर्यातीवर नियंत्रणासाठी किमान निर्यातमूल्य ८५० डाॅलर प्रति टन केल्यामुळे निर्यातीला आळा बसून कांदा दरात घसरण झाली होती. मात्र, ओखी चक्रीवादळामुळे वातावरणात बदल झाल्याने पिकांचे नुकसान झाले. उन्हाळ कांदा बाजारात येणे बंद झाल्याने सध्या लाल कांद्याला मागणी वाढली होती. मात्र मंगळवार आणि बुधवारी लाल कांद्याची बाजार समितीमध्ये आवक खूपच कमी झाल्याने दरात तेजी आली होती. लासलगाव, पिंपळगाव बाजार समितीमध्ये लाल कांदा 3 हजार ३०० ते 3 हजार ८०० रुपयांपर्यंत विक्री झाला. मात्र, बाजार समितीमध्ये पुन्हा लाल कांद्याची आवक वाढल्यानंतर दरात घसरण होण्याची शक्यता असल्याचे कांदा व्यापारी इम्तियाज पटेल यांनी सांगितले.

 

पुढील स्‍लाइडवर वाचा, द्राक्षमणी तडकल्याने शेतकऱ्यांपुढे संकट...  
 

बातम्या आणखी आहेत...