आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ration Card Holders Suffer Trouble Due To Blank Cards

कोऱ्या कार्डांअभावी शिधापत्रिकांचा घोळ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - कोऱ्या शिक्षापत्रिका (कोरे कार्ड) नसल्याने मागणी करणाऱ्या असंख्य नागरिकांना शिधापत्रिकाच मिळत नसून, शहर धान्य वितरण कार्यालयात मंजूर झालेले ३५० अर्ज, तर प्रत्येक तालुक्यातही सरासरी ५०० मंजूर अर्ज कोऱ्या शिक्षापत्रिकांअभावी पडून असून, कोऱ्या शिक्षापत्रिका नसल्याचे उत्तर नागरिकांना संबंधित यंत्रणेकडून दिले जात असल्याने नागरिकांतूनही नाराजी व्यक्त होत आहे. जिल्हाभरात लाख ४१ हजार ८०० कोऱ्या शिक्षापत्रिका आवश्यक असल्याची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे.

कुठलाही शासकीय लाभ घेण्यासाठी शिधापत्रिकेची मागणी केली जाते. त्यामुळे नवीन शिधापत्रिकेची मागणी आधार कार्ड आल्यानंतरही कायम आहे. परंतु, सध्या कोऱ्या शिधापत्रिकांची छपाईच होत नसल्याने जिल्हास्तरावर कोऱ्या शिक्षापत्रिकाच उपलब्ध होत नाहीत. परिणामी नागरिकांना शिधापत्रिका मिळत नसल्याची स्थिती आहे. जिल्ह्यासाठी लाख २६ हजार ३०० पिवळ्या शिधापत्रिका, लाख १० हजार ५०० केशरी, तर हजार शुभ्र शिधापत्रिकांची मागणी जिल्हा पुरवठा विभागाने शासनाकडे केली आहे. परंतु, गेल्या तीन-चार महिन्यांपासून त्या उपलब्धच होत नसल्याने नागरिकांना शिधापत्रिकांचे वाटप करण्यात अडचणी निर्माण होत आहेत. शहर धान्य वितरण कार्यालयानेही हजार कोऱ्या शिक्षापत्रिकांची मागणी केली आहे. त्याची पूर्तता करण्यासाठी आता जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

कार्डांसाठी शासनाकडे केलीय मागणी
शासन स्तरावर संगणकीकृत शिधापत्रिका देण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यामुळे कोऱ्या शिधापत्रिकांची छपाई बंद आहे. परंतु, तरीही शासनाकडे कोऱ्या शिधापत्रिकांची मागणी केली आहे. प्रत्येक तालुक्याला आवश्यक शिधापत्रिका एकमेकांकडून उपलब्ध केल्या जात आहेत. गोरक्षनाथगाडीलकर, जिल्हा पुरवठा अधिकारी