आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरात आठ ठिकाणी रावण दहनाचा आज कार्यक्रम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- दुष्ट प्रवृत्तीचा नाश करण्यासाठी शहरात रविवारी आठ ठिकाणी रावण दहनाचा कार्यक्रम होणार आहे. त्यात प्रामुख्याने गांधीनगर व पंचवटी परिसरातील दहनाच्या कार्यक्रमांचा समावेश आहे. गंगापूररोड व कॉलेजरोड परिसरात यंदा तब्बल चार ठिकाणी रावण दहनाचा कार्यक्रम होणार आहे.

दसर्‍याच्या दिवशी रावण दहन करण्याची प्रथा पूर्वापार पाळण्यात येत आहे. नाशिक शहरात पूर्वी केवळ गांधीनगर आणि रामकुंड परिसरातच सायंकाळच्या सुमारास रावण दहनाचा कार्यक्रम होत असे. महापालिका निवडणुकीच्या काळापासून मात्र रावण दहनाच्या कार्यक्रमांची संख्या वाढली आहे. त्यात गंगापूररोड येथील शिवशक्ती क्रीडांगण, फॉरेस्ट कॉलनी, नरसिंहनगर आणि पारिजातनगर येथे, पंचवटीत रामकुंड परिसरात, इंदिरानगर भागात साईनाथ चौक येथे रावण दहनाचा कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी 7 वाजेदरम्यान दहनाचा कार्यक्रम होणार आहे.

या कार्यक्रमासाठी जय्यत तयारी करण्यात आली असून, रावणाच्या मुखवट्याची सजावट करण्यात आली आहे. रावण दहनप्रसंगी आबालवृध्दांची गर्दी होत आहे.

वाहतूक मार्गात बदल
दरवर्षीप्रमाणे रावण दहनाच्या कार्यक्रमानिमित्त पंचवटी परिसरातील वाहतूक मार्गात बदल करण्यात आला असल्याचे शहर आयुक्तालयाच्या वतीने पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे. मालेगाव स्टॅण्ड- पंचवटी कारंजा -मालवीय चौक- शिवाजी चौक- सीतागुंफारोडने काळाराम मंदिर- सरदार चौक- साईबाबा मंदिर ते रामकुंडापर्यंत सायंकाळी 6 ते रात्री 9 वाजेपर्यंत मिरवणूककाळात वाहनांना प्रवेश बंद असणार आहे. मालेगाव स्टॅण्डकडून रामकुंड-सरदार चौक ते गाडगे महाराज पुलापर्यंत एकेरी मार्ग सुरू ठेवण्यात आला आहे.