आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Reach On Saptshringa Fort Within Three Minutes By Funiclur Boggy

सप्तशृंग गडावर अवघ्या तीन मिनिटांत फ्युनिक्युलर बोगीच्या साहाय्याने पोहोचता येणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धपीठ असलेल्या सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी गडाच्या पाचशे पाय-या चढण्याची आता गरज पडणार नाही. सार्वजनिक बांधकाम विभाग येथे बीओटी तत्त्वावर फ्युनिक्युलर बोगीची व्यवस्था करणार असून, येत्या 14 मेपर्यंत ही बोगी भाविकांसाठी उपलब्ध होईल. अवघ्या तीन मिनिटांत ही बोगी गडावर पोहोचणार असून, देशातील असा हा पहिलाच प्रकल्प ठरेल.गडाच्या खालच्या पायरीपासून मंदिरापर्यंत बोगीने जाण्याची व्यवस्था राहील. तासाला 20 फे-या होतील. खासगी ठेकेदाराला हे काम देण्यात आले आहे.
अशी असेल बोगी
बोगी रोपद्वारे बांधलेली राहील, दरड प्रतिबंधक उपाययोजना, बिघाड झाल्यास बोगी तातडीने बंद होईल, ट्रॉली थांबल्यास स्वतंत्र पाय-यांची सोय.
प्रतिप्रवासी : 40 रुपये (दरवर्षी 10 रुपयांनी वाढ)
वृद्ध व 12 वर्षांखालील मुलांसाठी : 20 रुपये (दर दोन वर्षांनी पाच रुपयांनी वाढ)
या सुविधा पुरविण्यात येतील : तिकीट घर, प्रतीक्षा कक्ष, पर्यटकांसाठी 24 वातानुकूलित खोल्या, पूजा साहित्य विक्रीची दुकाने, चप्पल स्टॅँड, मीटिंग हॉल, 200 वाहनांची पार्किंग व्यवस्था, कलादालन व संग्रहालय, उपाहारगृह, स्वच्छतागृह.
रोप-वे होणार बंद- सध्या येथे मटेरियल रोप-वे आहे. पूजा साहित्य व नारळाच्या वाहतुकीसाठी याचा वापर होतो. काही व्हीआयपींसाठीही रोप-वेचा वापर होतो. फ्युनिक्युलर बोगी सुरू झाल्यानंतर रोप-वे बंद करण्यात येईल. सध्या ज्या मार्गावर रोप-वे आहे, तोच मार्ग फ्युनिक्युलर बोगीसाठी राहील.
31.43 कोटी प्रकल्पाची किंमत
20.7 वर्षे ठेकेदाराकडून तिकीट वसुलीचा कालावधी
60 प्रवाशांची एका बोगीत व्यवस्था
02 स्वतंत्र बोग्या गड चढण्यासाठी व उतरण्यासाठी