आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजब-गजब: फेसबुकवर सुरू 25 वर्षे जुन्या ‘प्रिये’चा धुमाकूळ, वाचा काही गमतीशीर पोस्ट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - सोशल मीडियावरील बदलणारे भन्नाट ट्रेंड्स सोशल मीडियामध्ये जीवंतपणा आणत असतात, काही दिवसांपूर्वी अतिशय गाजलेला हॅशटॅग म्हणून ‘सिक्स वर्ड्स स्टोरी’ प्रसिद्ध झालेला. आता याहीपेक्षा जास्त धुमाकूळ घातला आहे तो, ‘प्रिये’ या हॅशटॅगने.. या संदर्भाने सुरू झालेले ‘सख्या’देखील फेसबुक व्यापत आहे. 
 
यामध्ये नक्की सुरुवात कुठून झाली हे शोधणे जरी अवघड असले, तरी मनोज सोवितकर या व्यक्तीच्या अकाउंटवरून ‘प्रिये’ची सुरुवात झाल्याचे दिसून येते. सुरुवातीला फक्त प्रेम कवितांच्या दोन ओळी पोस्ट केल्या जात होत्या. पाहता-पाहता फेसबुकवर ‘प्रिये’चे वारे पसरले आणि संपूर्ण सोशल मीडिया व्यापला गेला. 

यामध्ये इंस्टाग्राम, फेसबुकसह सगळ्याच सोशल नेटवर्किंग साइट‌्सवर ‘प्रिये’ नावाने स्टेटस पोस्ट होऊ लागले आहेत. फक्त दोन ओळींच्या कवितांमधून मार्मिक भाष्य करणे हे या कवितांचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. यामध्ये सध्या प्रेम कवितांवरून पुढे सामाजिक, आर्थिक, राजकीय परिस्थितीवरही भाष्य करण्यास सुरुवात झाली आहे. दोन ओळींमध्ये एखादी कोपरखळी किंवा प्रेमाची कबुली अगदी अशाच स्वरूपाचा हा खेळ जाेरात सुरू आहे. 

‘प्रिये’ नावाने प्रसिद्ध काही गमतीशीर पोस्ट 
- तू स्विस बँकेतले मोदींचे १५ लाख, मी तुझी वाट पहाणारं जनधनचं रिकामं खातं ‘प्रिये’.. 
-  तू माझी जीवाची मुंबई, मी तुझा निवांत पुणे ‘प्रिये’ 
- मी मुक्त हिंडणारा वळू, तू संस्कृतीच्या दावणीला बांधलेली गरीब गाय ‘प्रिये’ 
- तू परत केलेला पुरस्कार, मी हताश कुलभूषण ‘प्रिये’ 
- तू आरस्पानी चेहरा देखणा, मी नशीबवान आरसा फुटका ‘प्रिये’
- मी बँकांचे नवनवीन नियम,
- तू जिओच्या नवनवीन ऑफर्स ‘प्रिये 
 
‘प्रिये’ची मूळ कल्पना.. 
सुनीलजोग यांच्या २५ वर्षांपूर्वीच्या ‘प्रिये’ या हिंदी कवितेची मराठी नक्कल सुरू झाली. त्याचा ट्रेंड इतका वाढला की लोकांनी हा हॅशटॅग वापरून मनातली सगळी भडास काढणे सुरू केले. इथे सुरू झाली ‘प्रिये’ची प्रसिद्धी.. सुनील जोग यांच्या कवितेत ‘मुश्कील है अपना मेल प्रिये, यह प्यार नहीं है खेल प्रिये..’ 
 
पुढील स्लाइडवर वाचा, देशात सर्वाधिक हिट्स...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...