आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेंड झालेल्या युवकाला चक्क रेबीजचे इंजेक्शन!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
येवला - रोगापेक्षा उपचार भयंकर असाच काहीसा प्रकार येवल्याच्या ग्रामीण रुग्णालयात गुरुवारी पाहायला मिळाला. बेंड आलेल्या तरुणाला येथील परिचारिकेने चक्क रेबीजचे इंजेक्शन दिल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी रुग्ण युवकाच्या पालकांनी चौकशीची मागणी केली आहे.

ऋषिकेश गायकवाड (१७) हा युवक बुधवारी उपचार घेण्यासाठी आला होता. त्या वेळी डॉ. पाटील यांनी त्याला अँटिबायोटिकचे तीन इंजेक्शन घ्यायला सांगितले होते. बुधवारी त्याला पहिले इंजेक्शनही देण्यात आले. गुरुवारी तो दुसरे इंजेक्शन घेण्यासाठी आला असता त्या वेळी एका परिचारिकेने त्याला ‘रॅबिपुअर’ हे कुत्रा चावल्यानंतर देण्यात येणारे इंजेक्शन दिले. मात्र, बुधवारचे व आजचे इंजेक्शन वेगळे असल्याची शंका ऋषिकेशच्या वडिलांना आली. त्यांनी डॉ. किशोर पहिलवान यांना ती इंजेक्शनची बाटली दाखवली असता खरा प्रकार लक्षात आला.