आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विभागीय क्रीडा संकुलात उडाले राजेशाही स्वागत साेहळ्यांचे ‘बार’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - काेट्यवधी रुपये खर्चून बांधलेल्या विभागीय क्रीडा संकुलात नानाविध खेळांच्या माध्यमातून येणारे उत्पन्न नेमके काेठे जाते, याचा तपशील मिळत नसताना अाता चक्क येथील हिरवळीवर अालिशान स्वागत साेहळ्यासारख्या कार्यक्रमांचे बार उडू लागल्यामुळे अाश्चर्य व्यक्त केले जात अाहे. एखाद्या स्पर्धेप्रसंगी डीजे लावून चिअरअप करणे वा बक्षीस समारंभासारख्या छाेट्या साेहळ्यासाठी राखीव हिरवळीवर समारंभासाठी काेणी परवानगी दिली, हा मुद्दा अाता वादात सापडण्याची चिन्हे अाहेत. विशेष म्हणजे, एका बड्या अधिकाऱ्याच्या घरातील कार्यक्रम असल्यानेे काेणतेही अाक्षेप घेतले नसल्याचेही सांगितले जाते.

स्व. मीनाताई ठाकरे यांच्या नावाने असलेल्या पंचवटीतील विभागीय क्रीडा संकुलाचा कारभार गेल्या अनेक दिवसांपासून वादात अाहे. येथे इनडाेअर गेमसाठी अाकारल्या जाणाऱ्या शुल्काच्या पावत्या दिल्या जात नसल्यामुळे खेळाडूंनी संशय व्यक्त केला हाेता. त्यावर क्रीडा अधिकारी संजय सबनीस यांनी लवकरच पावत्यांची छपाई केली जाणार असल्याचे सांगितले हाेते. प्रत्यक्षात अद्याप त्याबाबत पूर्तता झालेली नाही. इनडाेअरच्या विविध स्पर्धेतून महिन्याला लाखाे रुपयांचे उत्पन्न मिळत असून, त्याचा हिशेब माहितीच्या अधिकारात मागण्यासाठी गेलेल्या अाम अादमी पक्षाला टाेलवाटाेलवीचा अनुभव अाला हाेता. दरम्यान, या संदर्भात संकुलाचे अध्यक्ष, विभागीय अायुक्तांकडेही चाैकशीची मागणी करण्यात अाली असून, त्याबाबत कारवाई हाेत नसल्यामुळे संशय व्यक्त केला जात अाहे. अशातच दाेन दिवसांपूर्वी विभागीय क्रीडा संकुलातील क्रीडा विभागाच्या कार्यालयाजवळील जागेवर चक्क जाेरदार लग्नसमारंभ झाल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या अाहेेत. या ठिकाणी अशा पद्धतीने लग्नसमारंभ वा अन्य कार्यक्रमासाठी जागा कशी दिली जाते, याबाबत अनेकांना माहिती नसल्यामुळे चर्चेला ऊत अाला हाेता.

हिरवळीवर नासाडी : क्रीडाकार्यालयालगतच्या हिरवळीचा उपयाेग विविध खेळांचे पारिताेषिक वितरण करणे स्पर्धेदरम्यान खेळाडूंना चिअरअप करण्यासाठी येथे डीजेसारखी संगीत व्यवस्था करण्यासाठी असल्याचे येथील सूत्रांनी सांगितले. प्रत्यक्षात एका अधिकाऱ्याच्या घरगुती साेहळ्यासाठी या हिरवळीचा वापर काेणाच्या इशाऱ्यावर झाला, याबाबत संबंधितांना माहिती नव्हती. क्रीडा अधिकारी कार्यालयातून यासाठी बुकिंग झाले असेल, असे येथील कर्मचाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, दाेन दिवसांनंतर हिरवळीवर खाण्याचे पदार्थ, अाइस्क्रीमचे चमचे, बुके अादी पडून हाेते. विशेष म्हणजे, रात्री निर्बंध नसल्याने काही हाैशी मंडळींनी सिंथेटिक ट्रॅकवर जाऊन मनसाेक्तपणे शाही कार्यक्रमाचा अानंदही लुटल्याचे सांगितले जाते. या ठिकाणी प्रशिक्षणासाठी अालेल्या खेळाडूंना या समारंभाचा त्रास हाेईल, याचेही भान बाळगले नसल्याची खंत व्यक्त केली जाते.

उत्पन्न वाढवण्यासाठीच परवानगी
क्रीडा संकुलातील जागेतून उत्पन्न मिळवण्यासाठी समारंभांना परवानगी दिली जात अाहे. त्यासाठी रीतसर तरतूद केली असून, साधारण हजारांपर्यंत शुल्क अाकारणी केली जाते. त्याबाबत अधिक माहिती क्रीडा विभागात उपलब्ध अाहे. - संजय सबनीस, क्रीडाअधिकारी, नाशिक