आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘स्पा’ सेंटरच्या नावाखाली सुरू असलेला कुंटणखाना उद््ध्वस्त

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - कॉलेज रोडपरिसरात स्पा सेंटर आणि मसाज पार्लरच्या नावाने सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिस उपआयुक्तांच्या पथकाने छापा टाकत पाच मुलींची सुटका केली. स्पा सेंटरच्या मालकासह महिला व्यवस्थापक अाणि ग्राहकावर गुन्हा दाखल करीत त्यांना अटक करण्यात अाली. मंगळवारी (दि. ४) सायंकाळी ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, पाेलिस अायुक्तांनी अवैध धंद्यावर कारवाईचे पाेलिस निरीक्षकांना अादेश दिले असतानाच गंगापूर पाेलिस ठाण्याच्या हद्दीत हा छापा टकाण्यात अाल्याने त्यांच्या अादेशालाच हरताळ फासल्याचेही बाेलले जात अाहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कॉलेजरोडवरील विसे मळ्यासमाेर असलेल्या ठक्कर मॅनेस्टिक या इमारतीमध्ये असलेल्या ‘अनेझी’ स्पा सेंटरमध्ये अनैतिक व्यवसाय सुरू असल्याची माहिती उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांना मिळाली होती. बनावट ग्राहकास येथे पाठवण्यात आले तेव्हा अनैतिक व्यवसाय सुरू असल्याची खात्री पटताच पाटील, सहायक आयुक्त डॉ. राजू भुजबळ, निरीक्षक राजेंद्र कुटे यांच्या पथकाने छापा टाकला. संशयित हेमंत परिहार आणि स्पा सेंटरची व्यवस्थापक असलेल्या एका संशयित महिलेस अटक करण्यात आली अाहे. पाच मुलींची सुटका करण्यात आली. वैद्यकीय तपासणी करून त्यांना वात्सल्य निराधारगृहात ठेवण्यात आले.

‘स्पा’रोडमुळेकाॅलेजराेड बदनाम : कॉलेजरोडचीओळख महिन्यांपासून स्पारोड म्हणून होत असल्याची नामुष्की अाेढवत अाहे. कॉलेजरोड गंगापूरराेड परिसरात ४०हून अधिक स्पा मसाज पार्लर असल्याची माहिती खुद्द पाेलिस सूत्रांनी दिली. पाेलिसांनी मंगळवारी टाकलेल्या छाप्यातील संशयित वर्षापूर्वी ज्याच्यावर कारवाई झाली ताे संशयित भागीदार असून, या मुलींना अदलबदल करून दुसऱ्या सेंटरवर अनैतिक व्यवसायासाठी पाठवले जात असल्याचीही माहिती पाेलिसांनीच दिली

गंगापूर पाेलिसांचेच अभय? : दीडते दाेन वर्षांपासून काॅलेजराेड गंगापूरराेडवर तत्कालीन उपायुक्त अंबिका यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक अायुक्त डाॅ. भुजबळ त्यापाठाेपाठ गुन्हे शाखेने स्पा सेंटर ब्युटीपार्लरच्या नावाखाली अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर छापे टाकले हाेते. त्यावेळी तत्कालीन पाेलिस निरीक्षक शंकरराव काळे असाे की सध्याचे वरिष्ठ निरीक्षक राजेश कुटे यांना मात्र याबाबत काहीच माहीत नसल्याचे उघडकीस अाले हाेते. यामुळे कारवाईनंतरही अवैध व्यवसाय सुरूच राहत असल्याने वरिष्ठ निरीक्षक पाेलिस ठाण्यातील सुभेदारांच्या अनभिज्ञतेविषयी खुद्द वरिष्ठांकडूनच संशय व्यक्त होत अाहे. स्पा सेंटर चालवणाऱ्यांवर कारवाई होते, मात्र गाळेमालक सहीसलामत सुटत असल्याने अाश्चर्य व्यक्त केले जाते.

पाेलिस महासंचालकांच्या दाैऱ्याच्या पूर्वसंध्येला जागरूक रहिवाशांच्या तक्रारीमुळे हा प्रकार उघडकीस अाल्याने संबंधित पाेलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांवर अायुक्त काय कारवाई करणार, याकडे लक्ष लागले अाहे. दरम्यान, आता तरी या गाळेमालकांवर कारवाई होणार का, असा सवाल परिसरातील नागरिकांनी केला आहे.
मोठे रॅकेट उघडकीस येणार
^स्पासेंटरच्या नावाखाली गरीब गरजू मुलींना कामावर ठेवत त्यांच्याकडून अनैतिक व्यवसाय करून घेणारे मोठे रॅकेट कार्यरत अाहे. संशयितांच्या व्यावसायिक भागीदारावर कारवाई केली जाणार आहे. या तपासादरम्यान मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे. -लक्ष्मीकांत पाटील, उपआयुक्त परिमंडळ
बातम्या आणखी आहेत...