देवळा - लाल कांदा बाजार समित्यांत दाखल झाल्याने उन्हाळ कांद्याचे भाव आता आणखी घसरणार आहेत. उमराणा बाजार समितीच्या आवारात कोकणखेडे (ता. चांदवड) येथील शेतकऱ्याने आणलेल्या लाल कांद्यास सोमवारी एक हजार १११ रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला.
सध्या उन्हाळ कांद्याला २५० ते ३०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत अाहे. चाळीत अधिक दिवस साठविल्याने तसेच परतीच्या पावसामुळे उन्हाळ कांद्याचे अाधीच मोठे नुकसान झाले आहे. त्यात आता लाल कांदा दाखल झाल्याने उन्हाळ कांद्याचे भाव अजून कोसळणार आहेत.