आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rediness Of Kumbhamela : KREDAI Give Land For Parking Of Sinhastha

तयारी कुंभमेळ्याची : सिंहस्थात पार्किंगसाठी क्रेडाई देणार भूखंड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - कुंभमेळ्यात लाखो भाविकांच्या वाहतुकीसाठी व पार्किंगसाठी किमान दोन लाख चौरस मीटर जागा हवी आहे. पोलिस आयुक्तालयाने तयार केलेल्या आराखड्यात 20 ठिकाणी पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी जिल्हा प्रशासन व पालिकेकडे केली आहे. दरम्यान, सरंगल यांच्या मार्गदर्शनाखाली केड्राईच्या पदाधिकार्‍यांची बुधवारी बैठक झाली. या बैठकीत आयुक्त सरंगल यांनी बांधकाम व्यावसायिकांना वाहतूक नियोजनासाठी सहकार्याचे आवाहन केले. क्रेडाईचे महाराष्ट्र अध्यक्ष अनंत राजेगावकर, जिल्हाध्यक्ष किरण चव्हाण, नरेश कारडा, अभय तातेड, सुनील कोतवाल, माजी अध्यक्ष जितूभाई ठक्कर, नेमिचंद पोद्दार आदींनी संमती दर्शवली. क्रेडाईमार्फतच डिजिटल मॅप, मार्ग दाखविणारे साइन बोर्ड तयार करून देण्याचे आश्वासन देण्यात आले.


विनामोबदला भूखंड
कुंभमेळ्यात पार्किंगची मोठी समस्या होईल. पोलिसांच्या आवाहनानुसार क्रेडाई सदस्यांचे भूखंड दोन महिन्यांसाठी विनाशुल्क उपलब्ध करून देण्यात येतील. किरण चव्हाण, क्रेडाई