आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘रेडीरेकनरबाबत कदापि अन्याय होऊ देणार नाही’, खडसे यांचा शब्द

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - रेडीरेकनरबाबतसरकार नाशिककरांवर अन्याय होऊ देणार नाही, असा शब्द महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी बुधवारी क्रेडाईच्या शिष्टमंडळाला दिला. क्रेडाई नाशिकचे अध्यक्ष जयेश ठक्कर यांच्या नेतृत्वाखालील शिष्‍टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्यासह अन्य मंत्र्यांची नागपुरात भेट घेतली.
शिष्टमंडळाने सांगितले की, नाशिकमध्ये सन २०१४ मध्ये अवास्तव पद्धतीने रेडीरेकनरचे दर वाढले असून, ते वास्तवातील बाजारदरापेक्षा िकतीतरी पट जास्त असल्याने खरेदी-विक्रीचे व्यवहार ठप्प झाले आहेत. शासनाचा महसूलही घटला असून, सर्वसामान्यांना घरांची खरेदी मुश्कील झाली आहे. सन २०१५ मध्ये रेडीरेकनरचे नवे दर वाढविता २०१४ चेही दर कमी व्हावेत, अशी मागणी शिष्टमंडळाने मुख्यमंत्री महसूलमंत्र्यांकडे केली. खडसे यांनी यावर नाशिककरांवर अन्याय होणार नाही, याची दक्षता घेतली जाईल, असे स्पष्ट केले. यासंदर्भात दोन दिवसांपूर्वीच राज्याच्या मुद्रांक नोंदणी आयुक्तांना सूचना दिल्‍याचेही त्यांनी सांगितले.
शिष्‍टमंडळाने मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह नगरविकासमंत्री रणजित पाटील, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांचीही भेट घेऊन शेल्टर प्रदर्शनाला भेट देण्याचे आमंत्रण दिले. क्रेडाईचे मानद सचिव सुनील कोतवाल, माजी अध्यक्ष सुरेश पाटील, राजू ठक्कर यांचा शिष्‍टमंडळात समावेश होता. या वेळी आमदार देवयानी फरांदे, आमदार बाळासाहेब सानप आमदार सीमा हिरे यांनीही नाशिककरांची बाजू मांडली.
मुख्यमंत्री देणार क्रेडाईला अर्धा तास
२६डिसेंबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिक दौऱ्यावर असून, या दौऱ्यात अर्ध्या तासाचा वेळ खास क्रेडाईसाठी देणार आहेत. क्रेडाईच्या विविध समस्या, सूचना जाणून घेणार असल्याचे त्यांनी क्रेडाईच्या शिष्टमंडळाला सांगितले.