आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकच्या रेडीरेकनरचा विषय आज नागपुरात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - नाशिकचे अवास्तव रेडीरेकनरचे दर काही क्षेत्रात कमी करावेत तर काही ठिकाणी जैसे थेच ठेवण्यात यावेत, ही नाशिककरांची मागणी घेऊन क्रेडाईचे शिष्‍टमंडळ बुधवारी (दि. १७) नागपुरात धडकणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना भेटून नाशिकमध्ये अन्याय दरवाढीमुळे अडचणीत आलेला बांधकाम व्यवसाय, त्यावर अवलंबून असलेले रोजगार, शासनाचा बुडालेला महसूल आणि सर्वसामान्यांचीही घरासाठी होत असलेली परवड याचे िवदारक चित्र हे शिष्‍टमंडळ शासनापुढे मांडणार आहे. शिष्‍टमंडळाच्या सोबत शहरातील विधानसभा विधानपरिषद सदस्यही असतील.

नाशिककरांनी सन २०१४ मध्ये सहन केलेल्या रेडीरेकनरच्या अन्याय्य दरवाढीचा परिणाम शहराच्या विकासावर आणि शासनाच्या महसुलावर जसा झाला तसाच तो सर्वसामान्य ग्राहकांवरही झाला असून, सन २०१५ करिता रेडीरेकनरचे दर वाढवू नयेत, उलट काही क्षेत्रात ते कमी करण्यात करण्यात यावेत, अशा आशयाची मागणी बांधकाम व्यावसायिकांची संघटना असलेल्या क्रेडाई, नाशिककडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्याकडे करणार आहे. या शिष्टमंडळात क्रेडाई नाशिकचे अध्यक्ष जयेश ठक्कर, माजी अध्यक्ष सुरेश पाटील, अवनिाश शिरोडे, सुयश पाटील, मानद सचिव सुनील काेतवाल यांचा या शिष्टमंडळात समावेश असेल.

- शहरातील अनेक भागातील रेडीरेकनरचे दर वास्तव दरांपेक्षा जास्त असल्याने आणि रेडीरेकनरशी उत्पन्न कर संलग्न केलेला असल्याने व्यवहार ठप्प आहेत. हे दर वास्तववादी व्हावेत अनेक ठिकाणी मागील वर्षाच्या तुलनेत दर कमी तर काही ठिकाणी जैसे थेच ठेवण्यात यावेत, सन २०१५ मध्ये काेणतीही दरवाढ केली जाऊ नये.

- रेडीरेकनरमधील तळटीप क्रमांक १७ या तळटीपेमुळे शहरातील ९७१ काेटी रुपयांवर मालमत्ता विक्रीअभावी पडून आहेत, ही तळटीप तत्काळ बदलण्यात यावी अधिक वास्तववादी व्हावी.