आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाणीकपात आता प्रशासनाच्या कोर्टात, महापौरांनी मागवला पाणीपुरवठा विभागाकडून अहवाल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - तिसऱ्या शाही पर्वणीनंतर शहरात एकवेळ पाणीपुरवठा करण्याचा निर्णय स्थायी समितीने घेतला असला तरी प्रशासनाची नेमकी काय तयारी आहे, हे जाणूनच निर्णय घेण्याचा पवित्रा महापौर अशोक मुर्तडक यांनी घेतला. त्यासाठी प्रशासनाकडून अहवाल मागवला जाणार असून, त्यानंतरच पाणीकपातीबाबत निर्णय होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

पावसाने फिरवलेली पाठ गंगापूर धरण समूहातील झपाट्याने कमी होणारा पाणीसाठा या पार्श्वभूमीवर स्थायी समितीने गुरुवारी शहरात २० सप्टेंबरपासून एकवेळ पाणी पुरवण्याचे आदेश दिले होते. सामान्यत: दरवर्षी पाणीकपातीबाबत प्रशासनाशी चर्चा करून महापौरांकडून निर्णय जाहीर होत असतो. मात्र मुंबई, पुण्यात पाणीकपात झाल्यानंतर नाशिकमध्ये कोणताही निर्णय झालेला नव्हता. दुसरी अडचण म्हणजे शहरात कुंभमेळा सुरू असून, पाणीकपात सहन करण्याची वेळ आली असती. अशा कोंडीत महापौरांकडून पाणीकपातीचा निर्णय प्रलंबित असताना स्थायी समितीने मात्र शहराची गरज असल्याचे सांगत एकवेळ पाणीपुरवठ्याचे आदेश दिले. दरम्यान, यासंदर्भात महापौरांना विचारले असता त्यांनी प्रशासनाकडून अहवाल मागवून त्यानंतर निर्णय घेतला जाईल, असे सांगितले. तिसऱ्या शाही पर्वणीनंतरच पाणीकपातीबाबत निर्णय होईल, असे सांगत त्यापूर्वी वरुणराजाने दिलासा दिला तर पाणीकपातीपासून नाशिककरांची सुटका होऊ शकेल.