आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संदर्भ रुग्णालय फायर सेफ्टीबाबत थंड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शालिमार परिसरात शासनाच्या वतीने विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय सुरू केले आहे. या रुग्णालयात केवळ उत्तर महाराष्ट्रातीलच नव्हे, तर पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातूनही औषधोपचारासाठी रुग्ण येतात. नाशिकसह खान्देशातील जळगाव, धुळे आणि नंदुरबार या तीनही जिल्ह्यांतील गोरगरिबांची संदर्भ सेवा रुग्णालयात नेहमीच गर्दी असते. या रुग्णालयातील कर्मचारी, रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांची संख्या पाहता त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने येथे विविध व्यवस्था असायला हव्यात, परंतु या रुग्णालयात आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रथम उपाय म्हणून वापरली जाणारी आग प्रतिबंधक उपकरणे, शिवाय कोणत्याही प्रकारची उपाययोजना केल्या गेलेल्या नसल्याची धक्कादायक बाब डी. बी. स्टारच्या पाहणीत समोर आलेली आहे. विशेष म्हणजे, या विभागीय रुग्णालयासाठी फायर सेफ्टी निधीची तरतूदच नसल्याची धक्कादायक बाब डी. बी. स्टारच्या पाहणीत समोर आली आहे. तसेच या रुग्णालयातील अनेक यंत्रणांमध्ये सध्या तांत्रिक बिघाड हाेत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. तसेच रुग्णालयात गेल्या काही दिवसांपासून शाॅर्टसर्किटच्या घटनांतही वाढ झालेली आहे. रुग्णांच्या सुरक्षेबाबत हलगर्जीपणा करून त्यांचा जीव धोक्यात टाकण्याचे काम आरोग्य विभाग करीत असल्याचे त्यावरून दिसत आहे. सर्वच शासकीय कार्यालयांनी फायर ऑडिट करणे आवश्यक असून त्यावर उपाययोजना करण्याचे आदेश असताना विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात त्याची अंमलबजावणी करण्यात आलेली नसल्याने आश्चर्य व्यक्त केला जात आहे. रुग्णालयात गेल्या वर्षभरात दाेन वेळा अागीच्या घटना घडूनही त्यासंदर्भात गंाभीर्य नसल्याचे स्पष्ट
आहार आणि फिटनेसबाबत अनिल कपूर नेहमीच सजग असतो. त्याला जिमला जायला मिळाले नाही तर तो इतर पर्याय निवडतो. आजकाल तो कामानिमित्त दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊनमध्ये आहे. तिथे तो डोंगरचढाई करत आहे. अनिलने सोशल मीडियावर एक व्हिडिअो अपलोड केला आहे. त्यामध्ये तो म्हणत आहे, ‘मी केपटाऊनचे सौंदर्य एन्जॉय करत आहे आणि डोंगरचढाई करत असतानाच व्यायामदेखील होत आहे. येथील नवनवीन पदार्थांचादेखील मी आस्वाद घेत आहे, परंतु कमी फॅट असलेल्या पदार्थांची मी निवड करत आहे.’
असे आहे आगीचे प्रकरण...
{गेल्या वर्षी संदर्भ सेवा रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये अचानक ऑपरेशनदरम्यान शाॅर्टसर्किटमुळे आग लागल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर रुग्णालय प्रशासनाकडून रुग्णालयाचे फायर ऑडिटसंदर्भात संपूर्ण माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाला पाठविण्यात आली होती. तर रुग्णालयासाठी फायर सेफ्टी निधी उपलब्ध करून देण्याचीही मागणी तत्कालीन अधीक्षक सुंदर कुलकर्णी यांनी सार्वजनिक विभागाकडे केली होती.

{ एप्रिल महिन्यातदेखील संदर्भ सेवा रुग्णालयाचे अतिदक्षता विभागाजवळ शाॅर्टसर्किटमुळे आग लागल्याची घटना घडली होती. यावेळी रुग्णालय प्रशासनाच्या वतीने तातडीने अग्निशमन विभागाला कळविल्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले होते. या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवित वित्तहानी झालेली नाही. या घटनेनंतरही रुग्णालयाचे सर्व इलेक्ट्रॉनिक्स यंत्रणेचे ऑडिट करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आल्या होत्या. मात्र, त्याकडे दुर्लक्षच केले जात आहे.

केपटाऊनच्या डोंगरावर अनिल कपूरचे कार्डियो
विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात ठिकठिकाणी दिसणारी ही फायर सेफ्टीची उपकरणे काेणत्याही कामाची राहिलेली नाहीत.

५६ लाखांच्या प्रस्तावाकडेही दुर्लक्ष
गेल्यावर्षी संदर्भ रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभागाला आग लागल्यानंतर रुग्णालय प्रशासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे फायर सेफ्टीच्या संदर्भात ५६ लाखांचा निधी देण्याची मागणी करण्यात आली होती. तसेच रुग्णालयात हवी तशी अग्नियंत्रणा नसल्याची संपूर्ण माहिती या प्रस्तावात देण्यात आलेली होती. मात्र, या प्रस्तावाकडेही दुर्लक्ष करण्यात आल्याचे समोर आले आहे.

या रुग्णालयांतही फायर सेफ्टी नाहीच
जिल्हाशासकीय रुग्णालय, महापालिकेच्या बिटको रुग्णालय, डॉ. झाकीर हुसेन रुग्णालय इंदिरा गांधी रुग्णालयातही फायर सेफ्टीची कोणत्याही प्रकारची यंत्रणा नसल्याची माहिती समोर आली आहे. या रुग्णालयांतही फायर सेफ्टीच्या कामांसाठी स्वतंत्र निधी दिला जात नसल्याचे चित्र आहे. दररोज हजारो रुग्ण या रुग्णालयात उपचारासाठी येत असतानाही या रुग्णालयातील फायर सेफ्टीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त हाेत आहे.

फायर सेफ्टी निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडेच
उत्तर महाराष्ट्रातील एकमेव सरकारी रुग्णालय म्हणून संदर्भ सेवा रुग्णालयाकडे बघितले जात असले, तरीही या रुग्णालयाच्या इमारतीस अद्याप पूर्णत्वाचा दाखलाच मिळालेला नसल्याचीही धक्कादायक बाब डी. बी. स्टारच्या पाहणीत समोरअाली अाहे. तब्बल अाठ वर्षांपासून या रुग्णालयात उपचार केले जात असताना केवळ सार्वजनिक बांधकाम खात्याच्या उदासीनतेमुळे पूर्णत्वाच्या दाखल्याची फाइल अद्याप नगररचना विभागाकडे पाठविण्यात अालेली नाही. परिणामत: वीज मीटर घेणेही रुग्णालय व्यवस्थापनाला कठीण झाले अाहे. तर सार्वजनिक बांधकाम खात्याकडून फायर सेफ्टी निधीही रुग्णालय प्रशासनाला दिला जात नसल्याची धक्कादायक बाब समोर आलेली आहे.

कम्प्लिशन सर्टिफिकेट नसल्यामुळेही अडचण
संपूर्ण उत्तर महाराष्ट्रासह राज्यातील अासपासच्या भागातील नागरिकांच्या साेयीसाठी नाशिकमधील संदर्भ रुग्णालय सुरू झाल्यापासून म्हणजे २००७ पासून या रुग्णालयाचे पूर्णत्वाचे प्रमाणपत्र त्याची तपासणी (कम्प्लिशन सर्टिफिकेट) झालेली नसल्याची बाब डी. बी. स्टारसमोर आली आहे. तसेच रुग्णालयात रुग्णालयाचे आणि निवासी संकुलाचे एकच वीज मीटर असून, या वीज मीटरवरही मोठ्या प्रमाणावर भार पडत असल्याचे चित्र आहे. यामुळे या वीज मीटरमुळेही रुग्णालयात शाॅर्टसर्किट होत असल्याचे समोर अाले आहे. म्हणजे, सुरक्षा तर दूरच; उलट यामुळे सर्वांच्याच जीवाला धाेका अाहे.

लिफ्टमध्ये सर्टिफिकेट नाही, शाॅर्टसर्किटचाही धोका
विभागीयसंदर्भ सेवा रुग्णालयात असलेल्या चार लिफ्टपैकी दाेन लिफ्ट नेहमीच खराब असतात. अनेकवेळा कोणत्याही मजल्यावर या लिफ्ट बंद होऊन जातात. लिफ्ट बंद पडल्याने किती गंभीर प्रकारची दुर्घटना हाेऊ शकते याची कल्पनाच जणू संबंधितांना नसल्याचा अाक्षेप घेण्यात येत अाहे. रुग्णालयातील एकाही लिफ्टमध्ये लिफ्ट चालू अाहे की बंद, याचे सर्टिफिकेट लावण्यात आलेले नाही. तसेच, अनेकवेळा लिफ्टमध्येही शाॅर्टसर्किटसारख्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांसह रुग्णांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

यंत्रणेचे पाॅवर ऑडिट नाही
विभागीयसंदर्भ सेवा रुग्णालयात शासनाकडून कोटी रुपये खर्च करून घेण्यात आलेल्या अत्याधुनिक यंत्रणेच्या देखभाल दुरुस्तीकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात असल्यामुळे रुग्णांची हेळसांड होत आहे. या अत्याधुनिक यंत्रणेचे गेल्या काही वर्षांपासून पाॅवर ऑडिटच झालेले नसल्यामुळे या यंत्रणेतही शाॅर्टसर्किटची प्रकरणे वाढली आहेत. शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून होणाऱ्या दुर्लक्षामुळे पाॅवर ऑडिट रखडले आहे. रुग्णालयातील रेडिआेथेरपी यंत्रणेसह रुग्णालयातील एकाही यंत्रणेचे अद्याप पॉवर ऑडिट झाले नसल्याचीही धक्कादायक माहिती समोर आली आहे.
बातम्या आणखी आहेत...