आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘संदर्भ सेवा’मधील सुरक्षा झाली कडक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शालिमार येथील विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयातील सुरक्षाव्यवस्था कडक करण्याचे आदेश संदर्भ सेवा रुग्णालयाचे कार्यकारी अधिकारी डॉ. व्ही. नामपल्ली यांनी रुग्णालयातील सर्वच विभागांना दिले आहेत. उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांना चांगल्या दर्जाची आरोग्यसेवा पुरविण्याच्या हेतूने काेट्यवधी रुपये खर्च करून सुरू केलेल्या या रुग्णालयातून सुरक्षाव्यवस्थेतील हलगर्जीपणामुळे लाखोंचे साहित्य चोरीला जात असल्याची बाब पुढे आल्यानंतर हे आदेश देण्यात आले आहेत.
रुग्णालयातील कार्यकारी अधिकारी डॉ. व्ही. नामपल्ली यांनी गुरुवारी संदर्भ सेवा रुग्णालयातील सर्व विभागांची तातडीची बैठक घेऊन रुग्णालयाच्या सुरक्षेविषयी चर्चा केली. यापुढे काेणत्याही व्यक्तींना रुग्णालयात प्रवेश करण्यासाठी अगोदर रुग्णालय प्रशासनाकडून पास घेणे बंधनकारक करण्याची, तसेच उपचारांसाठी दाखल रुग्णांसोबत फक्त एका नातेवाइकालाच परवानगी देण्याची सूचनाही या वेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांना देण्यात आली. संदर्भ सेवा रुग्णालयात मुळात संरक्षक भिंतच नसल्यामुळे या रुग्णालयामध्ये रात्री मद्यपींना सहज प्रवेश करता येताे. रुग्णालयाच्या आवारात ठिकठिकाणी मद्याच्या बाटल्यांचा खच पडलेला असून, वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या िनवासस्थानावरही माेठ्या अावाजात हाेत असलेल्या पार्ट्या चर्चेच्या विषय ठरू लागल्या अाहेत. त्यामुळे यापुढे आता संदर्भ सेवा रुग्णालयाची सुरक्षा रुग्णालय प्रशासनाकडून कडक होणार असल्याची माहिती डॉ. नामपल्ली यांच्या वतीने देण्यात आली.

{ प्रत्येक व्यक्तीला पास घेणे बंधनकारक.
{ रुग्णालय परिसरातील पार्किंगशिवाय अन्यत्र वाहन पार्क करता येणार नाही.
{ रुग्णांसोबत एकच व्यक्ती राहणार.
{ रुग्णालयातील नातेवाइकांकडून होणारी गर्दी टाळावी.
{ रुग्णालयातील सुरक्षारक्षकांची संख्या वाढवणार.

सुरक्षा करणार कडक
^उत्तर महाराष्ट्रातून शेकडो रुग्ण या रुग्णालयात येतात. रुग्णालयात गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या चोरीच्या घटनेनंतर रुग्णालयाच्या सुरक्षेत वाढ करण्याची सूचना केली आहे. यापुढे रुग्णालयात कडक सुरक्षा राहणार आहे. डॉ.व्ही. नामपल्ली, का..अधिकारी, संदर्भ सेवा