आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आधारकार्ड एजन्सी कर्मचाऱ्यास मारहाण, सुरक्षारक्षक देण्यास अधिकाऱ्यांचा नकार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - आधारकार्ड काढणाऱ्या एजन्सीच्या कर्मचाऱ्यास गेल्या शुक्रवारी नागरिकांनी मारहाण केल्याचा प्रकार पूर्व विभागीय तसेच पंचवटी विभागीय कार्यालयात घडल्यानंतर विभागातील आधार केंद्रासह शहरातील सर्व आधार केंद्र एजन्सीकडून बंद करण्यात आले होते. यानंतर आधार केंद्रास सुरक्षारक्षक नेमण्याची मागणी केली होती. मात्र, पूर्व विभागीय अधिकाऱ्यांनी सुरक्षारक्षक
देण्यास नकार दिल्याने जुन्या नाशकातील नागरिकांचे हाल होणार आहेत.
आधार कार्ड केंद्रावरील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी सुरक्षारक्षक नेमण्यात येत नाहीत तोपर्यंत केंद्र बंद राहणार असल्याचा इशारा एजन्सीने दिला होता. त्यानंतर सिडको पश्चिम विभाग कार्यालयात सुरक्षारक्षक देण्यात आल्यानंतर गुरुवारपासून हे केंद्र सुरू केले. मात्र, नाशिकरोड, सातपूर, पूर्व पंचवटी विभागीय अधिकाऱ्यांना सुरक्षारक्षक नेमण्याचे आदेश उपायुक्त फडोळ यांनी दिले होते. मात्र, पूर्व विभागीय अधिकारी मालिनी शिरसाठ यांनी केंद्राला सुरक्षारक्षक देण्यास नकार दिल्याने हे केंद्र आता कायमस्वरूपी बंद ठेवणार असल्याचा निर्णय आधार एजन्सींकडून घेण्यात आला आहे. मेनरोड येथील केंद्रावर काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यामुळे आधार कार्ड काढण्यास वेळ लागत होता. याचाच राग आल्याने एका नागरिकाने या सेंटरवरील एका कर्मचाऱ्यास शिवीगाळ करत मारहाण केली. या प्रकारानंतर कार्यालयात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. तर, पंचवटी विभागीय कार्यालयातही अशाच प्रमाणे दोन टवाळखोर युवकांकडून महिला कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करण्यात आल्याने या केंद्रावर मोठ्या प्रमाणावर गोंधळ झाला होता. तसेच, जोपर्यंत सेंटरवरील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी सुरक्षारक्षक देणार नाहीत तोपर्यंत सेंटर बंद राहील, असा पवित्रा सेंटरचालकांनी घेतला आहे. आता पूर्व विभागातील केंद्र बंद झाल्यामुळे नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागणार आहे.
अधिकाऱ्यांशी चर्चा करणार
पूर्व विभागाच्या आधार केंद्रावर दररोज शेकडो नागरिक नोंदणीसाठी येतात. केंद्र सुरू करण्याबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा करणार. शबानापठाण, सभापती, पूर्व विभाग
नागरिकांचे हाल पूर्वविभागीय कार्यालयात जुने नाशिक, रविवार कारंजा, द्वारका शालिमार परिसरातील शेकडो नागरिक दररोज आधार नोंदणीसाठी या केंद्रात येत होते. शहरातील आतापर्यंत सर्वात जास्त आधार नोंदणी करणारेदेखील पूर्व विभागाचेच आधार केंद्र होते. मात्र, आता विभागीय अधिकाऱ्यांनी या केंद्राला सुरक्षारक्षक दिल्याने हे केंद्र बंद झाले आहे.
विभागीय अधिकाऱ्यांचा ना
पूर्वविभागीय कार्यालयात दररोज शंभर जणांची नोंदणी सुरू होती. कर्मचाऱ्यास मारहाणीनंतर सुरक्षारक्षकाची मागणी केली होती. विभागीय अधिकाऱ्यांना विभागीय कार्यालयात केंद्र चालविण्यास परवानगी नाकारल्यामुळे केंद्र बंद करण्यात आले आहे. शाहनवाज शेख, व्यवस्थापक, आधार एजन्सी