आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रीडा संकुलात संस्थांना मिळणार सर्व सुविधा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - नाशिक शहरातील विभागीय क्रीडा संकुलात खेळाडू, प्रशिक्षण संस्था तसेच विभागातील शैक्षणिक संस्थांच्या सहभागाला अधिकाधिक प्राेत्साहन देण्याचे धाेरण निश्चित करण्यात अाले अाहे. या सर्व घटकांना विभागीय क्रीडा संकुलातील सुविधा रास्त दरात उपलब्ध करून देण्याचे निर्देश विभागीय महसूल अायुक्त एकनाथ डवले यांनी विभागीय क्रीडा संकुलाच्या बैठकीत दिले.
पंचवटीतील विभागीय क्रीडा संकुलात डवले यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय क्रीडा संकुलाची बैठक घेण्यात आली. त्यावेळी यासंबंधीचे विविध निर्णय घेण्यात अाले. त्यात प्रामुख्याने क्रीडा संकुलातील अपूर्ण राहिलेली कामे तत्परतेने पूर्ण करण्याचे अादेश देण्यात अाले.
बॅडमिंटनसाठी राेलेबल सिंथेटिक सरफेस उपलब्ध करणे, इनडाेअर स्टेडियममध्ये कुस्तीसाठी पाेडियम तयार करणे, संकुल परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावणे, अद्ययावत ध्वनिक्षेपक यंत्रणा, वसतिगृह, इनडाेअर स्पोर्टसाठी हाॅल अाणि पथदीपांसाठी साैरऊर्जेचा वापर करण्यासाठीची कामे प्राधान्यक्रमाने पूर्ण करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात अाला. तसेच क्रीडा संकुलाच्या सुरक्षेसाठी खासगी सुरक्षारक्षक नेमण्याचा निर्णयही या बैठकीत घेऊन सर्व कामे कालबद्ध कार्यक्रम अाखून पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात अाले.

या क्रीडासंकुलात उपलब्ध असलेली जिम्नॅस्टिक सुविधा, बॅडमिंटन हाॅल, टेबलटेनीस, शूटिंग रेंज, स्क्वॅश काेर्ट, जलतरण तलाव, मल्टीपर्पज प्लेइंग फिल्ड अाणि लाॅन तसेच वसतिगृहासह सर्व सुविधांचा अधिकाधिक खेळाडूंना उपयाेग हाेईल, असे धाेरण अाखण्याचा निर्णयदेखील घेण्यात अाला. अनेक प्रशिक्षण संस्था, शैक्षणिक संस्था यांना त्यांच्या स्पर्धांसाठी अथवा क्रीडा महाेत्सवांसाठी या सुविधांचा लाभ रास्त दरात देण्याचाही निर्णय या बैठकीत घेण्यात अाला. क्रीडा संकुलाच्या सदस्यांसाठी सकाळी अाणि सायंकाळी ते ही वेळ राखीव ठेवून दिवसभरातील बाकी वेळ या संस्थांना देण्याचे निर्देशही या बैठकीत देण्यात अाले. यावेळी जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर, संघटक भीष्मराज बाम, नरेंद्र छाजेड, नगरसेवक रुची कुंभारकर, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अार. के. पवार, जिल्हा क्रीडा अधिकारी संजय सबनीस अाणि माहिती उपसंचालक संजय लळीत अादी मान्यवर पदाधिकारी उपस्थित हाेते.