आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्षेत्रीय भविष्य निधी अायुक्तांची दाराेदारी जाऊन जनजागृती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: पेन्शनर्सच्या दारी पाेहाेचून त्यांना मार्गदर्शन करताना भविष्य निधीचे क्षेत्रीय अायुक्त जगदीश तांबे सहकारी.
नाशिक - सायंकाळची वेळ, कामावरून थकून परतणारे चाकरमाने अाणि थेट त्यांच्या दारातून ‘अाई, बाबा तुम्हाला पेन्शन मिळते, पण तुमच्या हयातीचा (जिवंत असल्याचा दाखला) दाखला तुम्ही अजूनही जमा केलेला नाही. हा अर्ज घ्या, असा दाखला कार्यालयात जमा करा, नाहीतर या महिन्यापासून तुमची पेन्शन बंद हाेईल. त्यामुळे हा अर्ज घ्या भरून कार्यालयात जमा करा, अामचे कर्मचारी तुम्हाला मदत करतील’, असे अावाहन करत दारात उभे असलेले क्षेत्रीय भविष्य निधी अायुक्त जगदीश तांबे त्यांचे सहकारी पाहून अवाक् झालेले पेन्शनर्स असेच काहीसे चित्र सिडकाे, कामगारनगर, कामटवाडे परिसरात पाहायला मिळाले.

पेन्शनरांनी नोव्हेंबर महिन्यात हयातीचा दाखला बँकेमार्फत जमा करणे अपेक्षित होते. कारण, हा दाखला दिल्यास पेन्शन बंद करण्यात येते. आतापर्यंत हयातीचा दाखला देणाऱ्या पेन्शनर्सची पेन्शन जानेवारी महिन्यापासून बंद हाेत असते. परंतु, शेवटच्या क्षणापर्यंत दाखले मिळविण्याचा प्रयत्न नाशिकच्या क्षेत्रीय भविष्य निधी कार्यालयाकडून सुरू अाहे. याकरिता सामाजिक बांधिलकी, तसेच वयोवृद्ध पेन्शनरांप्रति आदर सहयोग म्हणून कार्यालयातील कर्मचारी कार्यालय सुटल्यानंतर आपल्या घराच्या आसपास राहणाऱ्या पेन्शनधारकांच्या घरी जाऊन त्यांना हयातीच्या दाखल्याचे अर्ज भरण्याबाबत अपेक्षित माहिती देऊन मार्गदर्शन करीत आहेत. परिणामी ज्या ३५०० पेन्शनर्सची पेन्शन बंद होण्याची चिन्हे अाहेत, ती या माेहिमेमुळे सुरू राहू शकणार अाहे. यासाठीच ही विशेष माेहीम हाती घेत अायुक्त तांबे, त्यांचे सहकारी उपायुक्त शैलेंद्रसिंह, प्रवर्तन अधिकारी राजेंद्र शिरसाठ, सुनील बकरे यांच्यासह असे दाखले जमा करणाऱ्या पेन्शनर्सच्या दारी पाेहाेचले. काही ठिकाणी त्यांना पेन्शनर स्वतः भेटले, तर काही ठिकाणी त्यांच्या घरातील माणसे, काही ठिकाणी तर पेन्शनर्सच्या दुकानात अायुक्त तांबे पाेहाेचल्याने पेन्शनर्सही अवाक् झाले.

नाशिक देशात अव्वल
पेन्शनधारकांचे दाखले मिळविण्यात नाशिक देशात पहिल्या क्रमांकावर आहे. देशात पेन्शनधारकांची तिसरी सर्वात मोठी संख्या नाशिक कार्यालयांतर्गत असून, पेन्शनधारकांना नियमित पेन्शन मिळत राहण्यासाठी अाम्ही ही माेहीम हाती घेतली अाहे. जगदीश तांबे, क्षेत्रीय अायुक्त, भविष्य निधी कार्यालय
बातम्या आणखी आहेत...