आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संदर्भ रुग्णालयातील १४ एसी वर्षभरापासून बंद, उत्तर महाराष्ट्रातून येणाऱ्या रुग्णांचे हाल बंद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - माेठा काथ्याकूट करीत मिळविलेले सयेथील विभागीय संदर्भ रुग्णालयाचे अाराेग्य अाठ वर्षांतच ढासळायला लागले अाहे. रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागाची अवस्था सामान्य वॉर्डप्रमाणे झाली आहे. गेल्या वर्षापासून विभागातील वातानुकूलित व्यवस्था बंद असल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. अतिदक्षता विभागासह रुग्णालयातील डायलिसिस, कॅथ लॅब, कॅन्सर आणि युरो आॅपरेशन थिएटरमधील यंत्रणा बंद स्थितीत असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाला वारंवार कळवूनही यंत्रणा सुरू करण्याकडे दुर्लक्ष केले जात
असल्याची बाब पुढे अाली अाहे. गेल्या काही दिवसांपासून शालिमार परिसरातील विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात अत्याधुनिक यंत्रणेच्या अभावामुळे गोरगरीब रुग्णांना खासगी रुग्णालयात उपचार घ्यावा लागत अाहे. तसेच, संदर्भ सेवा रुग्णालयात संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातील गोरगरीब रुग्ण उपचारासाठी येत असल्यामुळे येथे मोठी गर्दी असते. परंतु, सध्या या रुग्णालयाचेच अाराेग्य धाेक्यात आाल्याची स्थिती अाहे. रुग्णालयातील मूत्रपिंड, कॅन्सर, हृदयाशी संबंधित विकारांवर सुलभ उपचारासाठी तयार करण्यात आलेले अतिदक्षता विभागातील एसी वर्षापासून बंद असल्याची माहिती समोर आली आहे. तर, सात महिन्यांपूर्वी रुग्णालयातील कॅथ लॅबमधील एसीला अचानक आग लागून ताे खाक झाला. त्या ठिकाणी उपचार घेत असलेले रुग्ण या अागीतून वाचले. त्यानंतर तेथे नवीन एसी बसविण्यासाठी प्रशासन स्तरावर हालचाल करण्यात आली होती. मात्र, अद्याप त्या ठिकाणी एसी बसविलेले नाहीत. तसेच, विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयाचे एसीचे दुरुस्तीची कामे २००८ पासून झालेलेच नसल्यामुळे रुग्णांना याचा फटका बसत आहे. डायलिसिस विभागातील चार एसी वर्षभरापासून बंद असल्यामुळे या ठिकाणी रुग्णांना योग्य ते उपचार देण्यास वैद्यकीय अधिकाऱ्यांना अडचण येत असल्याचे चित्र अाहे. याविषयी संबंधित संदर्भ रुग्णालयाकडून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इलेक्ट्रिकल विभागाकडे पत्र पाठविले आहे. मात्र, त्यावरही कार्यवाही झाली नाही. वर्षापासून बंद असलेले एसी सुरू करण्यासाठी आजवर काहीच उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. उन्हाळ्यात रुग्णांची होणारी अडचण लक्षात घेऊन रुग्णालयात पंखे बसविले आहेत. वर्षापासून या रुग्णालयातील सर्वांत महत्त्वाच्या विभागातील एसी बंद अाहेत.
प्रारंभापासून निधी नाही :
विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय बांधण्यात आल्यापासून या रुग्णालयाच्या देखभाल व दुरुस्तीसाठी शासनाकडून निधी देण्यात आलेला नाही. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाकडूनही या दुरुस्तीकडे डोळेझाक केली जात असल्याचे समोर आले आहे.

या विभागातील एसी बंद
{ अाॅपरेशन थिएटरमधील २ एसी बंद
{ डायलिसिस विभागातील ४ एसी बंद
{ कॅथ लॅबमधील १ एसी बंद
{ अतिदक्षता विभागातील ४ एसी
वर्षभरापासून बंद { युरो आेटीमधील २
एसी बंद { कॅन्सर विभागातील १ एसी बंद
देखभालीसाठी निधी नाही
^संदर्भ सेवा रुग्णालयातील एसी गेल्या काही दिवसांपासून बंद आहेत. या रुग्णालयासाठी शासनाकडून देखभाल-दुरुस्तीसाठी निधीची तरतूद केलेली नसल्याने या रुग्णालयातील एसी दुरुस्तीचे काम रखडले आहे. यासाठी शासनस्तरावर पाठपुरावाही सुरू आहे.
- एम. पी. हुपळे, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, इलेक्ट्रिकल