आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Regional Sanitation Inspector Latest News In Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

घंटागाडी ठेकेदारास २५ हजारांचा दंड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सातपूर- सातपूर विभागातील वाढता कचरा व अनियमित घंटागाडी संदर्भातील तक्रारींची दखल घेत विभागीय स्वच्छता निरीक्षकांनी वॉटरग्रेस या घंटागाडी ठेकेदारावर २५ हजार रुपयांच्या दंडाची कारवाई केली.
घंटागाडी येत नसल्याने काही दिवसांपासून ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. सातपूर विभागातील कचरा उचलण्याचा ठेका वॉटरग्रेस संस्थेस देण्यात आला आहे. मात्र, ठेकेदारांकरवी परिसरातील पूर्ण कचरा उचलला जात नाही. ठेकेदाराच्या ताब्यातील घंटागाड्या नेहमीच नादुरुस्त असतात. ठेकेदाराला वारंवार नोटीस देऊनही घंटागाड्यांची दुरुस्ती होत नाही. परिणामी प्रभागात घंटागाड्याच जात नाहीत. त्यामुळे नागरिकही दोन ते तीन दिवस वाट पाहून रस्त्याच्या कडेला कचरा फेकून देतात. यामुळे सातपूर विभागात ठिकठिकाणी कच-याचे ढीग दिसून येत आहेत. नागरिकांचा वाढता रोष लक्षात घेऊन आरोग्य अधिकारी सुनील बुकाणे व विभागीय अधिकारी महेंद्र पगारे यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय गांगुर्डे यांनी ठेकेदारावर २५ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई केली. ठेकेदाराच्या बिलातून या दंडाची रक्कम वसूल होणार असल्याचे गांगुर्डे यांनी सांगितले.