आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Releasing Water From Sewage In Govdavari Is Denger

मलनिस्सारण केंद्रातून गाेदावरीत साेडले जाणारे पाणी धाेकादायक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - सिंहस्थ कुंभमेळा, तसेच उच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीमुळे चर्चेत अालेले गाेदावरी प्रदूषण नियंत्रण त्यासाठी मलनिस्सारण केंद्र (एसटीपी) उभारूनही हाेण्याची चिन्हे नसून सद्यस्थितीत या केंद्रातून प्रक्रिया करून गाेदावरीत साेडल्या जाणाऱ्या पाण्याची गुणवत्ताही चिंताजनक असल्याची बाब उच्चस्तरीय समितीच्या पाहणी दाैऱ्यातून पुढे अाल्याचे वृत्त अाहे. पाण्याची गुणवत्ता वाढवायची असेल तर किमान शंभर काेटी रुपयांचा खर्चही हाेण्याची शक्यता पालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने खासगीत व्यक्त केली. अाधीच िनधीची चणचण त्यात ही नवीनच समस्या समाेर अाल्यामुळे अधिकाऱ्यांची डाेकेदुखी वाढली अाहे.
गेल्या दाेन वर्षांपासून गाेदावरी प्रदूषणाचा मुद्दा गाजत असून, महापालिकेच्या दुर्लक्षामुळे गाेदावरी गटारीकरणविराेधी मंचने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली अाहे. न्यायालयाने गाेदावरी प्रदूषण राेखण्यासाठी अत्यंत कडक पावले उचलली असून, ‘निरी’ या तांत्रिक उपाय सुचवणाऱ्या ख्यातनाम संस्थेची नेमणूक केली अाहे. एवढेच नव्हे तर विभागीय अायुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समितीही स्थापन केली अाहे. या समितीने दाेन िदवसांपूर्वी गाेदावरीची पाहणी केली. त्यात गाेदावरीत थेट सांडपाणी पाेहचवणाऱ्या १९ नाल्यांपैकी १० कायमस्वरूपी बंद, तर वळवण्यात अाल्याचे समाेर अाले. हे सांडपाणी गाेदापात्रालगतच्या भुयारी गटारी याेजनेतून मलनिस्सारण केंद्रात पाेहचवले जात अाहे. येथे प्रक्रिया करून हे पाणी पुन्हा गाेदावरीत साेडले जात असून, त्याची गुणवत्ता तपासणीही समितीने केली. त्यात धक्कादायक बाबी अाढळल्याचे सूत्रांचे म्हणणे अाहे. सेंट्रल पब्लिक हेल्थ एन्वायरमेंटल इंजिनिअरिंग अाॅर्गनायझेशनने निश्चित केलेल्या मानकाप्रमाणे बीअाेडी अर्थातच बायाेलाॅजिकल अाॅक्सिजन डिमांड तथा पाण्यातील विद्राव्य प्राणवायूची क्षमता १० पेक्षा कमी असणे गरजेचे अाहे. प्रत्यक्षात समितीने घेतलेल्या नमुन्यात बीअाेडी जवळपास ३० पर्यंत अाढळल्यामुळे ती चिंतेची बाब ठरू शकेल.

प्रक्रिया करून साेडलेल्या पाण्याची क्षमता वाढवायची असेल तर नवीन यंत्रसामुग्री तंत्राचा वापर करावा लागेल. त्यासाठी जवळपास शंभर काेटी रुपयांची गरज भासणार असून, अाता महापालिका वा उच्चस्तरीय समिती या निधीची उभारणी कशी करते, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले अाहे.

‘निरी’कडे अहवाल पाठवून घेणार सल्ला
मलनिस्सारणकेंद्रातून सांडपाण्याची प्रक्रिया करून साेडल्या जाणाऱ्या पाण्यातील बीअाेडी जास्त अाढळल्यामुळे अाता उच्चस्तरीय समिती ‘निरी’चा सल्ला घेण्याच्या विचारात अाहे. त्यादृष्टीने एकूणच परिस्थितीचा अहवाल ‘निरी’ला पाठवला जाणार असल्याची माहितीही सूत्रांनी िदली.