आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘रिलायन्स फ्रेश’मध्ये आढळली अनियमितता; खराब पदार्थ ठेवल्याचे निष्पन्न

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- मेरी-म्हसरूळ परिसरातील रिलायन्स फ्रेश मॉलमधील अन्न पदार्थ व फळे-पालेभाज्यांची तपासणी केली असता अन्नसुरक्षा व मानके कायद्यानुसार अनियमितता आढळल्याने गुरुवारी कारवाई करण्यात आली. या मॉलमधून काही पदार्थांचे नमुने ताब्यात घेण्यात आले असून, त्यांचा अहवाल येताच त्यानुसार पुढील कारवाई केली जाणार असल्याचे अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

याबाबत अन्नसुरक्षा अधिकारी प्र. शि. लोहार व ए. यू. रासकर यांनी सांगितले की, या मॉलमध्ये तपासणीत सडलेली व कुजलेली फळे, विक्री कक्षाच्या भिंती ओलसर असल्याचे आढळले. अन्न पदार्थाच्या जवळ कुठल्याही प्रकारची रसायने ठेवण्यास परवानगी नसताना स्वच्छतेसाठीच्या रसायनांचे डबे हे खाद्यपदार्थांजवळ ठेवल्याचेही स्पष्ट झाले. ब्रेड आणि केक यांची मुदत संपली असतानाही ते विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. विक्री आणि साठवणूक या दोन्ही कक्षाचे सिलिंग निघालेले होते. या मॉलमधून हिंग, चिली, व्हिनेगर व रिफाईंड सनफ्लॉवर ऑईल यांचे नमुने घेण्यात आले असून, तपासणीसाठी ते पाठविण्यात येणार आहे. या विभागाचे सहआयुक्त चंद्रकांत पवार यांनी सांगितले की, शहरातील इतर मॉलचीही तपासणी करण्यात येणार आहे.