आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Relief Of Hailstorm Hit Farmers Get From 1 April Minister Radhamohan Singh

गारपीटग्रस्तांना १ एप्रिलपासून बँक खात्यात मदत मिळणार - कृषिमंत्री राधामोहन सिंह

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतक-यांना, ज्यांची घरे पडली आहेत त्यांना केंद्र आणि राज्य सरकारकडून एकत्रितपणे २५ हजार रुपयांची तातडीची मदत एप्रिलमध्ये देण्यात येईल. ती १ एप्रिलपासून शेतक-यांच्या खात्यांत वर्ग केली जाईल. या नैसर्गिक आपत्तीमध्ये मृत व्यक्तींना अडीच लाखांची मदत दिली
जाईल. तसेच शेतक-यांसाठी कृषी आमदनी विमा योजना सुरू केली जाईल, अशी माहिती केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी येथे दिली.

निफाड तालुक्यातील सारोळे, वनसगाव, उगाव येथे १३ आणि १४ मार्च रोजी अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतक-यांचे प्रचंड नुकसान झाले. कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी शनिवारी या भागाचा दौरा करत झालेल्या नुकसानीची, काेसळलेल्या द्राक्षबागांची पाहणी केली. सारोळे येथे शेतक-यांशी संवाद साधून त्यांना धीर दिला. काँग्रेस सरकारने शेतक-यांचा विकास करण्यऐवजी त्यांना अडचणीच्या ठरतील, अशा योजना देशभरात अमलात आणल्या. त्यामुळे लाभ कमी आणि अडचणीच जास्त, अशी शेतक-यांची स्थिती झाल्याची टीका सिंह यांनी सांगितले. आता ही परिस्थिती बदलणार आहे, असा दावा त्यांनी केला.

पालकमंत्र्यांच्या भाषणात हस्तक्षेप : पालकमंत्री गिरीश महाजन शेतक-यांशी संवाद साधताना चर्चा दुस-याच विषयांकडे वळाल्याचे पाहून त्यात केंद्रीय कृषिमंत्र्यांनी हस्तक्षेप केला. शेतक-यांना मदत कधी देणार हे सांगा, असे स्पष्टपणे सुनावत त्यांनी उपस्थित शेतक-यांमध्ये विश्वास निर्माण करणारे वातावरण तयार केले.

जलसिंचन योजना देशभरात
भविष्यात प्रत्येक गावातील शेतक-यांना मुबलक पाणी मिळण्यासाठी राज्याने जलयुक्त शिवार अभियान सुरू केले आहे, तर केंद्र सरकार एप्रिलमध्ये पंतप्रधान जलसिंचन योजना सुरू करणार असल्याचे राधामोहन सिंह यांनी सांगितले.