नाशिक : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने क्लाेजर नाेटिसा बजावलेल्या पन्नास उद्याेगांपैकी अपेक्षित पूर्तता केलेल्या किमान तीस-पस्तीस प्लेटिंग उद्याेगांची संक्रांत गाेड हाेणार, अशी चिन्हे अाहेत. मुंबईत मंडळाचे मुख्य सचिव पी. अलबनगल यांच्याशी निमा मेटल फिनिशर्स असाेसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या भेटीनंतर हे चित्र स्पष्ट झाले अाहे. यामुळे राेजगार बुडण्याची भीती निर्माण झालेल्या कामगारांनाही यामुळे दिलासा मिळणार अाहे.
सातपूर अंबड अाैद्याेगिक वसाहतीत किमान दाेनशेच्या अासपास प्लेटिंग अाणि काेटिंग उद्याेग अाहेत. यापैकी ४८ उद्याेगांना प्रदूषणाचे नियम-अटींच्या पूर्तता केल्याचे कारण देऊन थेट क्लाेजर नाेटिसा देण्यात अाल्या अाहेत.
यापैकी काही उद्याेगांनी मंडळाकडे कागदपत्रांची पूर्तता केली हाेती तरीही त्यांनाही क्लाेजर नाेटिसा बजावल्याची चर्चा उद्याेजकांत सुरू हाेती. दुसरीकडे हे उद्याेग सुरू व्हावेत, याकरिता नाशिक इंडस्ट्रीज अॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असाेसिएशन अाणि मेटल फिनिशर्स असाेसिएशन यांच्याकडून प्रयत्न सुरू अाहेत.
त्याचाच भाग म्हणून गत अाठवड्यात या उद्याेगांच्या प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन करताना प्रदूषण मंडळाचे मुख्य सचिव पी. अलबनगल यांनी अाठवडाभरात पूर्तता करणाऱ्या उद्याेगांचा प्रश्न साेडवू, असे अाश्वस्त केले हाेते. यानंतर गुरुवारी ‘निमा’च्या पदाधिकाऱ्यांनी या उद्याेजकांसह मुंबई गाठत अलबनगल यांच्याशी चर्चा केली हाेती. त्यानुसार किमान ३५ उद्याेगांचे प्रश्न दाेन दिवसांत सुटणार असल्याचे ‘निमा’च्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.