आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महापालिकेत अखेर ९० अभियंत्यांची खांदेपालट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महापालिकेत नगररचना, बांधकाम, पाणीपुरवठा अशा महत्त्वाच्या खात्याशी संबंधित जवळपास ९० अभियंत्यांना कार्यमुक्त करण्यात अाले असून, बदलीच्या कारवाईनंतर तब्बल दाेन महिन्यांनी अंमलबजावणी झाली अाहे. बदल्यांना स्थगिती मिळेल, अशा अाशेत असलेल्या अधिकाऱ्यांना धक्का मानला जात अाहे.
कुंभमेळ्यानंतर अायुक्त डाॅ. गेडाम यांना खातेअंतर्गत माेठे फेरबदल केले हाेते. त्यानुसार शिपाई, लिपिकापासून विभागीय अधिकाऱ्यापर्यंत बदल्या झाल्या हाेत्या. पालिकेत बांधकाम, नगररचना, पाणीपुरवठा अशा महत्त्वपूर्ण कामासाठी माेठ्या प्रमाणात तांत्रिक कर्मचारी कार्यरत अाहेत. या कर्मचाऱ्यांच्याही बदल्या करण्यात अाल्या हाेत्या. त्यात जवळपास ९० अभियंत्यांचाही समावेश हाेता. या अभियंत्यांची बदली झाली असली तरी पाणीपुरवठ्यासारख्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना तत्काळ कार्यमुक्त करणे अवघड हाेते. अाता पावसाने हजेरी लावल्यामुळे पाणीप्रश्नाची धग काहीशी कमी हाेणार गृहीत धरून ९० अभियंत्यांना बदलीच्या ठिकाणी रुजू हाेण्याचे फर्मान अायुक्तांनी धाडले. बदली झाली असली तरी जुने नवीन काम अशा दाेघांचा मेळ साधावा लागणार असून, कामाची घडी बसेपर्यंत एकमेकांना मदत करण्याचे अादेश अायुक्तांनी दिले अाहेत. ट्रॅफिक सेल, स्मार्ट सिटी, पंतप्रधान अावास याेजना, विकास अाराखडा अशा सेलशीसंबंधितही कर्मचाऱ्यांची नियुक्ती झाली अाहे.
बातम्या आणखी आहेत...