आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Relveborda Officer, Latest News In Divya Marathi

‘पंचवटी’च्या प्रवाशांचा अधिका-यांना घेराव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकरोड- रेल्वेबोर्ड, रेल्वे मंत्रालयाच्या अखत्यारीतील विशेष सुपरफास्ट गाड्यांसाठी स्थानिक प्रवाशांच्या महत्त्वपूर्ण पंचवटी एक्सप्रेसला साईड ट्रॅक केले जात असल्याने संतप्त प्रवाशांनी बुधवारी सकाळी नाशिकरोड रेल्वे स्थानकाच्या अधिकाऱ्यांना घेराव घातला. यापुढे पंचवटीची वेळ पाळली गेल्यास रुळावर उभे राहून आंदोलनाचा इशारा देण्यात आला.
पंचवटी एक्सप्रेसचा गेल्या काही दिवसांपासून मुंबईपर्यंतचा रडतखडत प्रवास सुरू आहे. प्रवासी नोकरीच्या ठिकाणी उशिराने पोहचत असल्याने त्यांना ‘लेट मार्क’ लागत आहेत. व्यावसायिक मुंबईत कामासाठी वेळेत पाेहचू शकत नाहीत. गेल्या आठवड्यात नियमित धावणारी ‘पंचवटी’ तीन दिवसांपासून अर्ध्या तासापेक्षा अधिक उशिराने धावत आहे. मंगळवारी अर्धा तास उशिराने धावलेली ‘पंचवटी’ बुधवारी सकाळी ७.१० ऐवजी ७.४० वाजता नाशिकरोड स्थानकावर येऊन ७.४४ वाजता मुंबईकडे रवाना झाली. मनमाड ते नाशिकदरम्यान अर्धा तास उशिर झाला असला तरी मुंबईला नियोजित वेळेत पोहचण्याची प्रवाशांना अपेक्षा होती. मात्र, दादरला सकाळी १०.३० ऐवजी ११, तर छत्रपती शिवाजी टर्मिनसला सकाळी १०.४५ ऐवजी ११.२० वाजता म्हणजे ३५ मिनिटे ती उशिराने पोहचली.
मनमाड स्थानकावरून नियोजित वेळेत सुटलेली ‘पंचवटी’ ओढा स्थानकाच्या अलीकडेच थांबवण्यात अाली. हावडा येथून येणारी ‘दुरांतो’ने सकाळी ७.२० , तर राजेंद्रनगर एक्सप्रेसने ७.३० वाजता नाशिकरोड स्थानक सोडल्यानंतर ७.४० वाजता ‘पंचवटी’चे नाशिकराेडला अागमन झाल्याने प्रवाशांनी अधिकाऱ्यांना घेराव घातला. ‘दुरांतोला हिरवा कंदील देण्याच्या सूचना भुसावळ नियंत्रण कक्षातून येतात, स्थानिक पातळीवर या निर्णयाचे अधिकार आम्हाला नाहीत,’ असे अधिका-यांनी या वेळी स्पष्ट केले.
अधिका-यांशी चर्चा करणार
नाशिकच्या प्रवाशांसाठी एकमेव महत्त्वपूर्ण पंचवटी एक्सप्रेस उशिराने धावत असल्याने गुरुवारी (दि. २) रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे. हेमंतगोडसे, खासदार