आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

२६/११ हल्ल्यातील हुतात्म्यांचे स्मरण, रक्तदान शिबिरालाही उत्स्फूर्त प्रतिसाद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक; पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या मुंबईवरील नापाक हल्ल्यात शहीद झालेल्या पाेलिस अाणि जवानांसह विविध घटनांत शेकडाे देशवासीयांना आदरांजली वाहण्यासाठी प्रतिमांना केवळ फुले किंवा पुष्पहार अर्पण करण्याएेवजी अापल्याच रक्ताचे दान करण्याची परंपरा नाशिककरांनी यंदाही पाळली. वुई फाउंडेशनने २६/११ निमित्त राबविलेल्या या उपक्रमात ५०० हून अधिक रक्तदात्यांचा सहभाग लाभला होता.

सागरमल माेदी विद्यालयाच्या प्रांगणात गुरुवारी या विशेष दिनानिमित्त हे रक्तदान शिबिर झाले. पाेलिस अायुक्त एस. जगन्नाथन सहायक पाेलिस अायुक्त सचिन गाेरे यांच्या उपस्थितीत रक्तदान यज्ञाचा शुभारंभ झाला. या वेळी बाेलताना जगन्नाथन यांनी देशाच्या रक्षणार्थ शहीद झालेल्या पाेलिस जवानांबराेबरच सामान्य नागरिकांच्या बलिदानाला ही श्रद्धांजली असल्याचे सांगितले.
रक्तदानामुळे रक्त घेणाऱ्याचा जीव वाचताेच, शिवाय रक्तदात्याच्या शरीरातही शुद्ध रक्त निर्माण हाेत असल्याने त्याचाही फायदा हाेत असताे. असा हा दुहेरी लाभ असल्याने रक्तदान करण्याचे अावाहनदेखील त्यांनी केले. या वेळी माजी महापाैर विनायक पांडे अाणि डाॅ. अनिरुद्ध धर्माधिकारी उपस्थित हाेते. रक्तदानाच्या या उपक्रमाला अर्पण ब्लड बँकेचेही सहकार्य लाभले हाेते.
वुई फाउंडेशनतर्फे आयोजित कार्यक्रमात शहिदांना पुष्पहार अर्पण करताना पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन.

सागरमल मोदी शाळेतील कार्यक्रमाप्रसंगी विद्यार्थिनी वुई संस्थेच्या सदस्यांनी अशी आकर्षक आणि प्रतीकात्मक रांगोळी काढली.

जुने नाशिक परिसरातही २६/११ तील शहिदांचे स्मरण करण्यात आले. यानिमित्त युसुफिया फाउंडेशनतर्फे नाशिक रक्तपेढीच्या सहकार्याने रक्तदान शिबिर झाले. सारडा सर्कल भागातील या शिबिरात मुस्लिम बांधवांनी मोठ्या संख्येने रक्तदान केले. दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी हिंदू-मुस्लिम एकतेची शपथ घेण्यात आली. या वेळी पोलिस उपआयुक्त एन. अंबिका, विजय पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड, युसुफिया फाउंडेशनचे अध्यक्ष हाजी मुजाहिद शेख, रियाज मेमन, हबीब शेख, लतिफ पटेल, राशीद शेख, इम्रान शेख आदी उपस्थित होते.

पाेलिसांचेही रक्तदान
याउपक्रमास शुभेच्छा देण्यासाठी अालेल्या नाशिकच्या पाेलिस उपायुक्त एन. अंबिका यांच्या सहकाऱ्यांनीही येथे रक्तदान केले. तसेच, उपस्थितांनाही रक्तदानाचे अावाहन केले. वुई फाउंडेशनच्या माध्यमातून रक्तदात्यांना प्रमाणपत्र एक भेटवस्तूदेखील देण्यात येत हाेती.

महिलांनीही केले रक्तदान
वुईफाउंडेशनचे पदाधिकारी रस्त्यावर उभे राहून रक्तदानासाठी अावाहन करत हाेते. त्याला रस्त्यावरून जाणाऱ्या-येणाऱ्या नागरिकांनी चांगलाच प्रतिसाद दिला. त्याचबराेबर अनेक महिलांनीदेखील या रक्तदानात माेठ्या हिरिरीने सहभाग नोंदवल्याचे फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष परेश राका यांनी सांगितले.