आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भंगार बाजार हटविल्याने अायुक्तांविराेधात याचिका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - चुंचाळे शिवारातील भंगार बाजार हटविण्याचे अादेश सर्वाेच्च न्यायालयाने दिले असतानाही अायुक्तांनी त्यावर कार्यवाही केली नसल्याचा ठपका ठेवत शिवसेनेचे माजी नगरसेवक दिलीप दातीर यांनी अायुक्तांविराेधात न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान केल्याची याचिका गुरुवारी (दि. ७) दाखल केली. यासंदर्भात महिन्यापूर्वी अायुक्तांना नाेटीस देऊनही त्यावर काेणतेही पाऊल उचलण्यात अाले नाही, असे दातीर यांनी सांगितले.

चुंचाळे शिवारातील भंगार बाजार हटविण्यात का पुढे येत नाही, भंगार व्यावसायिक पालिका अायुक्तांचे जावई अाहेत का, सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्णयाचीही प्रशासनाला तमा नाही का, असे प्रश्न उपस्थित करीत शिवसेनेने गेल्या महिन्यात अायुक्तांविराेधात ताेफ डागली हाेती. परंतु, त्यानंतरही प्रशासनाने बाजार हटविण्याची कार्यवाही केल्याने अखेर दातीर यांनी अवमान याचिका दाखल केली. याबाबत बाेलताना दिलीप दातीर म्हणाले की, भंगार बाजार ही शहराची गरज असून, ताे हटविल्यास शहरात सर्वत्र भंगारातील साहित्य दिसू शकते, अशी भूमिका प्रशासनाने काही महिन्यांपूर्वी मांडली हाेती. त्यामुळे या बाजारासाठी पर्यायी जागेचा प्रशासनाकडून शाेध सुरू अाहे.

पांजरापाेळची जागा व्यावसायिकांनी नाकारली
वास्तविक,१९९५ मध्येच पांजरपाेळ येथील सर्व्हे क्रमांक ७५ मध्ये पालिकेने भंगार बाजारासाठी जागा अारक्षित केली हाेती. परंतु, त्यावेळी न्यायालयात दावा दाखल करीत भंगार मालाच्या व्यावसायिकांनी जागा नाकारली. त्यामुळे अाता या व्यावसायिकांना पुन्हा अारक्षित जागा देण्याची गरजच नाही. मुळात भंगार बाजारातील व्यावसायिकांनी उच्च न्यायालयात दाेन वेळा शपथपत्र सादर करून महापालिकेच्या हद्दीबाहेर जाण्याचे कबूल केले अाहे.
भंगार बाजाराचा मुद्दा हा शहराच्या सुरक्षिततेशी संबंधित अाहे. अनेक गुन्हेगारी कृत्य या भागात हाेतात. यापूर्वी या ठिकाणी प्राणघातक हत्यारे अाणि स्फाेटकेही सापडली अाहेत. त्यामुळे प्रशासन अाता शहरात बाॅम्बस्फाेट हाेण्याची वाट बघत अाहे का, असा सवालही दिलीप दातीर यांनी केला अाहे. अतिक्रमण निर्मूलन विभागातील अधिकारी अाणि भंगार बाजारातील व्यावसायिक यांचे अार्थिक संबंध असल्यामुळेच बाजार हटविण्याच्या कारवाईस टाळाटाळ केली जात असल्याचा अाराेप दातीर यांनी केला अाहे. नगररचना विभागानेही दाेन ते तीन वेळा रेखांकनाच्या नावाने वेळकाढूपणा केला असल्याचे यावेळी सांगण्यात अाले.

न्यायालयाचीही भीती नाही
सर्वाेच्च न्यायालयाने भंगार बाजार हटविण्याचे स्पष्ट अादेश दिलेले असतानाही प्रशासनाने त्यावर अद्याप कारवाई केलेली नाही. त्यामुळे अवमान याचिका दाखल करण्याची ३० दिवसांची नाेटीस मी महिन्यापूर्वी दिली हाेती. परंतु, तरीही मग्रुर प्रशासनाने कारवाई केली नाही. थाेडक्यात प्रशासनाला अाता न्यायालयाच्या निर्णयाचीही भीती राहिली नाही की काय, अशी शंका येते. -दिलीप दातीर, याचिकाकर्ते
बातम्या आणखी आहेत...