आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरकारची 2 वर्षे: GR चा धांडोळा, दाखवतो Govt चा शहरी तोंडवळा, 101 बैठका, 15176 GR

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोणत्याही सरकारचा वर्धापन दिन हे त्यांच्या कामाचे मूल्यमापन करण्यासाठीचे औचित्य असते. दोन प्रकारे हे मूल्यांकन होते. सत्ताधारी पक्ष आपल्या कामगिरीचे गोडवे गातो, तर विरोधक सरकारच्या अपयशाचे रडगाणे. सर्वसामान्यांना मात्र यातून नेमके वस्तुनिष्ठ मूल्यमापन मिळत नाही. म्हणूनच सामान्य माणसाच्या आयुष्यात सरकारने काय बदल आणला हे मांडण्यावर ‘दिव्य मराठी’चा कटाक्ष आहे. त्याच अनुषंगाने शासननिर्णयांच्या (जीअार) अभ्यासावरून राज्य सरकारच्या कामाविषयीची ही मांडणी.

नाशिक - मुख्यमंत्री देवंेद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्ष-शिवसेना युती सरकारच्या सत्ताग्रहणाला पुढच्या रविवारी म्हणजे ३० ऑक्टोबर रोजी दोन वर्षे पूर्ण होत आहेत. या दोन वर्षांत राज्याच्या विकासाला कशी दृष्टी दिली याचे पाढे सरकारकडून वाचले जाऊ लागले आहेत. मात्र, सरकारने गेल्या २३ महिन्यांत घेतलेले निर्णय पाहिले तर या सरकारचा तोंडवळा शहरीच अधिक असल्याचे दिसते. गृहखात्याची कामगिरी बरी वाटत असली तरी गुन्ह्यांच्या नोंदीत वाढ झाल्याचेही चित्र समोर येते. ग्रामविकास, आदिवासी विकास ही खाती वाऱ्यावरच असल्याचे स्पष्ट होत असून शिक्षण, आरोग्य खात्याचा पेपर अजून कोराच दिसतो आहे. नगरविकास, महसूल, उद्योगात मात्र प्रगती आहे.

१५ हजारांहून अधिक जीअारचा अभ्यास
निवडणुकीच्या वेळी भाजपने दिलेल्या जाहीरनाम्यात काय होते आणि गेल्या दोन वर्षांत त्यापैकी कोणती आश्वासने कितपत पूर्ण झाली याबाबत सामान्यांच्या मनात प्रश्न आहेत. त्याच्याशी बांधिलकी ठेवत दोन वर्षांत घेण्यात आलेल्या सर्व शासन निर्णयांची वस्तुनिष्ठ छाननी करून सरकारच्या कारभाराचे परीक्षण करण्याचे पत्रकारितेतील नवे पाऊल ‘दिव्य मराठी’ने उचलले आहे. यासाठी शासननिर्णय, मंत्रिमंडळ निर्णय आणि जाहीरनाम्याची अत्यंत बारकाईने छाननी करून प्रस्तुत विश्लेषण केले गेले अाहे.

शासननिर्णय हे सरकारच्या कामकाजाचे महत्त्वाचे प्रतिबिंब असते. शासनाने घेतलेल्या धोरणात्मक निर्णयांसह प्रशासकीय कामकाज शासन निर्णयाशिवाय होत नाही. म्हणजे जीआर हे शासनाचे धोरण विशद करणारे आदेशच असतात. मंत्रिमंडळातील धोरणात्मक निर्णय प्रशासनाने कशाप्रकारे अमलात आणले, याचे ते निदर्शक ठरतात. त्यामुळे सरकारी कामाच्या मूल्यमापनासाठी जी.अार. नक्कीच एक महत्त्वाचा स्राेत ठरावा.’
- द. म. सुकथनकर, माजी सनदी अधिकारी
पुढील स्लाइड्सवर वाचा, सरकारच्या कामगिरीचा लेखाजोखा...
बातम्या आणखी आहेत...