आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Report On Maratha Reservation Will Submit Before The Election Narayan Rane

मराठा आरक्षणाचा अहवाल निवडणुकीपूर्वीच सादर करणार - नारायण राणे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - ‘मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात संपूर्ण राज्यातून प्राप्त झालेल्या 2,216 निवेदनांवर आणि शिक्षण व आर्थिक सर्वेक्षणातील एकत्रित झालेल्या माहितीवर मुंबईत स्वतंत्र बैठक घेतली जाईल. या बैठकीतील निर्णयाचा अहवाल लोकसभा निवडणुकीपूर्वीच राज्य सरकारला सादर केला जाईल,’ अशी माहिती मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष तथा उद्योगमंत्री नारायण राणे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
राज्यातील मराठा समाजाचा इतर मागास प्रवर्गात समावेश करण्यासाठी राज्य शासनाने नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. या समितीने पहिले तीन महिने कामच केले नाही. त्यामुळे 21 मार्च 2013 रोजी तिचे फेरगठण करत सहा महिने मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतर राणे समितीने नागपूर, पुणे, मुंबई, औरंगाबाद, कोकण असे विभागनिहाय दौरे करून त्या- त्या भागातील मराठा संघटना व नागरिकांचे आरक्षणाबाबत मते जाणून घेतली.
रविवारी या समितीने नाशिकमध्ये शेवटचा दौरा केला. यावेळी अनेक शिष्टमंडळांनी स्वतंत्र आरक्षणाच्या बाजूने तर काहींनी ओबींच्या हिश्यात आरक्षण देण्याची मागणी केली.
‘राज्यभरातून प्राप्त झालेल्या निवेदनांचा सरकार विचार करेल. तसेच मराठा समाजाची आर्थिक आणि शिक्षणाची स्थिती जाणून घेण्यासाठी सर्वेक्षण महत्वाचे आहे. त्यासाठी वेळ लागणार असून त्याचा आणि निवेदनांतील मागण्यांचा अहवाल एकत्रित करुन मुंबईत अंतिम बैठक होईल. त्याचा अहवाल प्रथम राज्य शासनास सादर केला जाईल. त्यानंतर शासनास वाटले तर ते मंत्रिमंडळात आणि नंतर अधिवेशनात प्रस्ताव ठेवतील’, असे राणे यांनी स्पष्ट केले. यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आदिवासी विकासमंत्री मधुकर पिचड, आमदार माणिकराव कोकाटे उपस्थित होते.
.तर मुख्यमंत्र्यांसह राणे समितीचे फोटो तु़डवू : मेटे
लोकसभा निवडणुकीपूर्वीच मराठा समाजाला आरक्षण द्यावे. र्शेयवादाचा कुठलाही मुद्दा त्यात येणार नाही. आम्ही स्वत:च राणे समितीच्या सदस्यांसह मुख्यमंत्र्यांचा सत्कार करू. परंतु तसे न झाल्यास मात्र गावोगावी त्यांचे फोटो पायदळी तुडवत त्यांना त्यांची जागा दाखवू, असा इशारा राष्ट्रवादीचे आमदार विनायक मेटे यांनी दिला. मराठा समाजातही मोठय़ा प्रमाणावर आर्थिक दुर्बल घटकांची संख्या असून त्यांच्याच हितासाठी आरक्षणाची मागणी केली जात असताना त्याकडे शासनाकडून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोपही मेटे यांनी केला.
शेतकर्‍यांच्या मागणीसाठी दिंडी
छावा संघटनेने निवेदन देण्यास अडविल्याचा आरोप करत आंदोलनाचा पावित्रा घेतला. नंतर समितीने त्यांच्याही निवेदनाचा स्वीकार केला. आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या वारसांना मदत करण्याच्या मागणीसाठी आलेल्या ‘आधारतीर्थ’च्या शिष्टमंडळाने थेट दिंडीच विर्शामगृहात आणल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
सर्वपक्षीय मराठा नेते एकत्र
राणे समिती येथील शासकीय विर्शामगृहावर शिष्टमंडळांच्या भावना जाणून घेत होती. मराठा आरक्षण हा वादातील मुद्दा ध्यानात घेऊन या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तसेच एका शिष्टमंडलात केवळ सहाच व्यक्तींना प्रवेश दिला जात होता. यानिमित्ताने आरक्षणाच्या मागणीसाठी सर्वच पक्षातील मराठा समाजाचे नेते एकत्र झाल्याचे दिसून आले.
‘ओबीसी’तच आरक्षणासाठी 188 निवेदने
नाशिकमध्ये विविध संघटनांनी एकूण 349 निवेदने राणे समितीला सादर केली. त्यात सर्वाधिक 188 संघटनांनी ओबीसी आरक्षणातच मराठा समाजाचा समावेश करण्याची मागणी केली. पाच संघटनांनी आरक्षण देऊ नये अशी तर 97 संघटनांनी स्वतंत्र आरक्षण देण्याची मागणी केली. आरक्षणाच्या सर्मथनार्थ आणि विविध मागण्यांचे 40 निवेदने प्राप्त झाली तर स्वतंत्र आरक्षणाची मागणी 19 संघटनांनी केल्याची माहिती राणे यांनी दिली.