आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रजासत्ताकदिनी रंगला सोहळा देशभक्तीचा..

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक-शहरातील विविध पक्ष, संघटना, सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्था, महाविद्यालये व शाळांमध्ये रविवारी ध्वजवंदन व सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले.

बिटको महाविद्यालय
येथे महाविद्यालयाच्या प्रांगणात प्राचार्य राम कुलकर्णी यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. या वेळी एनसीसी व एअर विंगच्या विद्यार्थ्यांनी परेड घेऊन मानवंदना दिली. स्क्वा. लीडर कै. वैद्य ट्रॉफी पारस जाधव व सोनाली पवार यांना देण्यात आली. या प्रसंगी सांस्कृतिक कार्यक्रम झाले.

संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक मंडळ
या मंडळाच्या अभ्यासिका व र्शीराम सार्वजनिक वाचनालय यांच्या वतीने वसंतराव लोखंडे यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. प्रकाश दलाल यांच्या हस्ते भारतमातेचे पूजन झाले. या वेळी भास्करराव तानपाठक, बाळासाहेब सानप, सुभाषचंद्र अग्रवाल, राज शेळके, डॉ. पारस सुराणा, भरत सांगळे, किरण टिळे, विलास आव्हाड, कैलास आंबेकर, नंदा खैरनार आदी उपस्थित होते.

हिरे विद्यालय, सिडको
पवननगर येथील हिरे विद्यालयात जगन अण्णा पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. या वेळी परिसरातून प्रभात फेरी काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक व देशभक्तीपर गीत सादर केले. कार्यक्रमास एस. जी. शेवाळे, आर. पी. ननसारे, एस. आर. सोनवणे, शिक्षक, पालक उपस्थित होते.

धन्वंतरी महाविद्यालय
या महाविद्यालयात प्रजासत्ताक दिन विविध मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा झाला. या वेळी सरोज धुमणे पाटील, श्यामराव केदार, जयंत पाटील, बागुल, भामरे, प्राचार्य, शिक्षकवृंद, विद्यार्थी उपस्थित होते.

क. का. महाविद्यालय
चांदोरी येथील या महाविद्यालयात प्रजासत्ताकदिन संस्थेचे उपाध्यक्ष काशीनाथदादा टर्ले यांच्या हस्ते झेंडावंदन करून साजरा झाला. कार्यक्रमास प्राचार्य संतोष वाघ, एम. बी. झाडे, प्रा. व्ही. एस. जाधव, सुरेश भोज, माणिकराव गायखे, अमृता टर्ले, देवराम निकम आदी उपस्थित होते.

शिवाजी तरुण मित्रमंडळ
जुन्या नाशकातील कथडा येथील शिवाजी तरुण मित्रमंडळातर्फे भगवान कहार यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. कार्यक्रमास केशव शिरसाठ, मनोज परदेशी, सुरेश कातकाडे, श्याम काळे, गोविंदा कहार, सदाशिव खरपुडे, गणेश जमधडे, अजय नागरे, आकाश भास्कर, अप्पा भास्कर, हर्षल परदेशी आदी उपस्थित होते.

नर्गिस दत्त कन्या विद्यालय
नर्गिस कन्या विद्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रभातफेरी काढून नगरसेवक बाळासाहेब सानप यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. या वेळी लेजीम पथक, सूर्यनमस्कार व एनसीसीचे संचलन, मानवी मनोरे सादर केली. कॉपीमुक्त अभियान यावर आधारित शपथ एम. यू. निकम यांनी विद्यार्थ्यांकडून घेतली. कार्यक्रमास थळकरताई, दिंडे, हिंगेसर, शिक्षक, विद्यार्थी व नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते

प्रजासत्‍ताक दिनाच्‍या कार्यक्रमाचे छायाचित्रे पुढील स्‍लाइडवर...