आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सांस्कृतिक कार्यक्रमांनी वाढली प्रजासत्ताकदिनाची रंगत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- प्रजासत्ताकदिनी विविध सामाजिक संघटनांच्या वतीने सामाजिक उपक्रमदेखील राबविण्यात आले. शाळा, महाविद्यालयांतर्फे शोभायात्रा काढण्यात आल्याने शहर परिसरात देशभक्तीचा अपूर्व सोहळा रंगला होता.

सारडा कन्या विद्यालय
सारडा कन्या विद्यालयात मुख्याध्यापिका सविता खरे यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. या वेळी छत्रपती क्रीडा पुरस्कारप्राप्त शाळेची माजी विद्यार्थिनी स्नेहल विधाते उपस्थित होती. प्रजासत्ताकदिनाचे महत्त्व सांगून मुख्याध्यापिका खरे यांनी विद्यार्थिनींना देशभक्तीचा संदेश दिला. या वेळी हस्तलिखितांचे प्रकाशनही करण्यात आले.

राष्ट्रवादी युवक कॉँग्रेस
राष्ट्रवादी पूर्व विभागातर्फे एकात्मता व अखंडतेचा संदेश देण्यासाठी अध्यक्ष इम्रान पठाण यांनी गुलाब पुष्प व पेढे वाटून प्रजासत्ताकदिन साजरा केला. मुजाहिद अन्सारी,नजीर सय्यद, अमजद पठाण, संजय महाले, तुषार काळे, रवी जाधव आदी उपस्थित होते.

महात्मा फुले समता परिषद
अखिल भारतीय समता परिषदेतर्फे प्रभाग क्रमांक 41 मध्ये नगरसेवक राजेंद्र महाले यांच्या हस्ते भारतमातापूजन व ध्वजवंदन करण्यात आले. या वेळी घनश्याम ओझरकर, जयेश शर्मा, अश्विन गडपे आदी उपस्थित होते.

सविस्‍तर बातमी वाचण्‍यासाठी आणि सांस्‍कृतिक कार्यक्रमांची फोटा पाहण्‍यासाठी पुढील स्‍लाइडवर क्लिक करा...