आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीसोबत : गवई

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकरोड- आगामी लोकसभा-विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीशी युती करणार असल्याचे रिपाइं (गवई) चे सरचिटणीस डॉ. राजेंद्र गवई यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

पक्षबांधणी, आगामी निवडणुका व नूतन कार्यकारिणी निवडीसाठी गवई नाशिक दौर्‍यावर आले होते. चैत्यभूमीजवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी जागा मिळण्यामागे रामदास आठवले, आनंदराज आंबेडकर व आपण अशा सर्वांचे प्रयत्न असल्याचे सांगून र्शेय वादावर त्यांनी पडदा टाकला.

पत्रकार परिषदेपूर्वी पक्ष मेळावा झाला. महिला आघाडी अध्यक्षा मायावती शिरसाठ यांनी महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्याची मागणी मेळाव्यात केली. जिल्ह्यातील मागासवर्गीयांची अनेक प्रकरणे वर्षानुवर्षे कौटुंबिक न्यायालयात पडून असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी प्रदेशाध्यक्ष सुबोध वाघमोडे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. एस. जी. ओहळ, जिल्हाध्यक्ष भारत पुजारी, चंदूशेठ खोब्रागडे यांच्यासह दौर्‍यात कार्यकर्ते मोठय़ासंख्येने उपस्थित होते.

डॉ. गवई म्हणाले
पक्ष बळकटीकरणासाठी राज्याचा दौरा
पक्षाला राज्यात जनाधार असताना शासनकर्ते होत नसल्याने चिंतन
जातीचा शिक्का पुसून सर्व जाती-धर्मीयांचा पक्ष निर्माण करणार.
अहमदनगर हत्याकांडप्रकरणी संशयितांना अटक करण्यात हलगर्जीपणा करणार्‍या पोलिसांच्या निलंबनाची मागणी

ग्रामीण भाग वंचितच
अँड. प्रकाश आंबेडकरांच्या जातीच्या दाखल्यावरील उल्लेखाबाबत सहमत नाही, दाखल्यावर जातीचा उल्लेख नसल्यास आरक्षणाचा प्रश्न येईल. शहरात समाज पुढारलेला असला तरी ग्रामीण भाग वंचित आहे. आशिष नंदी यांच्या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो. डॉ. राजेंद्र गवई, राष्ट्रीय सरचिटणीस आरपीआय (गवई गट)