आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Research News In Marathi, Defence Robot, Mines Finder, Divya Marathi

संशोधन: शत्रूने सीमेवर पेरलेले भूसुरुंग शोधून देणारा रोबोट तयार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - भारताच्या सीमेवरील माईन्स (भूसुरुंग) शोधण्याचे यंत्र जर तयार झाले तर किती जवानांचे प्राण वाचतील याची कोणी कल्पना केलीय? अशी कल्पना करूनच महावीर तंत्रनिकेतनमधील विद्यार्थ्यांनी मोबाइलने ऑपरेट करता येण्याजोगा रोबोट तयार केला आहे. हा रोबो 360 अंशात पूर्ण गोल फिरतो. तो सीमेवरील माईन्स शोधण्याचे काम करू शकतो, असा दावा या विद्यार्थ्यांनी केलाय.


महावीर तंत्रनिकेतनच्या तृतीय वर्ष संगणक शाखेतील विद्यार्थी तेजस रमेश कोर आणि सुमीत सुरेश जाधव यांनी घरगुती वस्तूंचा वापर करीत कमी खर्चात रोबोट विकसित केला आहे. कोणत्याही अँड्राइड मोबाइलवर तो ऑपरेट होतो. तूर्त त्याची क्षमता 100 मीटरपर्यंत आहे. अवघ्या एका सेकंदात तो मोबाइलवर कार्यान्वित होतो. यापूर्वी तयार करण्यात आलेले बहुसंख्य रोबोट मागे, पुढे, डावीकडे किंवा उजवीकडे फिरतात. मात्र, हा रोबोट संपूर्ण गोलाकार फिरतो. त्यामुळे त्याचा उपयोग पार्किंगमध्येदेखील होऊ शकतो. या विद्यार्थ्यांना प्रा. अनुप सोनवणे व प्रा. किशोर डोंगरे यांचे मार्गदर्शन लाभले.