आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरातील समस्यांचा आता संशोधकांकडून अभ्यास

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शहरातील विविध प्रकारच्या समस्यांवर मंगळवार (दि. २६)पासून मंथन होणार असून, इनाेव्हेटिंग फाॅर बिलियन्स बूट कॅम्पअंतर्गत दीडशे संशाेधकांनी शहरात भेडसावणाऱ्या समस्यांच्या संकलित केलेल्या माहितीचे सादरीकरण केले जाणार अाहे. शहराला विविध प्रकारच्या समस्या भेडसावत असून, या समस्यांचा सखाेल अभ्यास करून त्यावर उपाययाेजना शाेधल्या जाणार अाहेत.
टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेसतर्फे नाशिकमध्ये इनाेव्हेशन सेंटर सुरू करण्यात येणार असून, या पार्श्वभूमीवर टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेस, कुंभथाॅन, एमअायटी मीडिया लॅब अाणि नाशिक डिस्ट्रिक्ट इनाेव्हेशन काैन्सिल यांच्या संयुक्त विद्यमाने ‘इनाेव्हेटिंग फाॅर बिलियन्स’ या बूट कॅम्पचे अायाेजन करण्यात अाले अाहे. या कॅम्पमध्ये सहभागी झालेल्या संशाेधकांकडून अाराेग्य, वाहतूक, शिक्षण, कचरा व्यवस्थापन, सार्वजनिक सुरक्षितता, कृषी, पाणी व्यवस्थापन यांसारख्या क्षेत्रातील समस्यांची माहिती संकलित करण्यात अाली अाहे. यावर मंथन हाेणार आहे.

संशाेधकांचे चार गट
इनाेव्हेटिंग फाॅर बिलियन्स बूट कॅम्पमध्ये देशरातील दीडशे संशाेधक सहभागी झाले अाहेत. या संशाेधकांना शिक्षण, अाराेग्य, कृषी, वाहतूक, कचरा व्यवस्थापन, पाणी व्यवस्थपान, सार्वजनिक सुरक्षितता हे क्षेत्र समस्या जाणून घेण्यासाठी देण्यात अाले हाेते. क्षेत्राच्या व्यापकतेनुसार संशाेधकांचे चार ग्रुप तयार करण्यात हाेते. या ग्रुपच्या सर्व सदस्यांना देण्यात अालेल्या क्षेत्रातील समस्यांची माहिती संकलित केली अाहे.

लसीकरणाच्या प्रसारात कमालीची उदासीनता
^शहरातील बहुतांश हाॅस्पिटलमध्ये लसीकरणाचा तक्ता नसल्याचे दिसून येत अाहे. तर, ज्या हाॅस्पिटलमध्ये अशा प्रकारचे तक्ते लावण्यात अाले अाहेत, ते सर्व इंग्रजी भाषेत अाहे. त्यामुळे लसीकरणाच्या तक्त्याकडे दुर्लक्ष हाेते. परिणामी, लसीकरणाची माहिती पाेहोचत नाही. -कुशाग्र चव्हाण, एनअायटी,सुरत

फास्ट फूड सेवनाचे प्रमाण अधिक
^प्राथमिक स्वरूपात शहराचा अभ्यास केला असता, नाशिकमध्ये फास्ट फूड सेवन करणाऱ्यांचे प्रमाण माेठ्या प्रमाणावर अाहे. त्यामुळे हृदयविकारासंबंधी अाजारांमध्येदेखील वाढ झाल्याचे दिसून येत अाहे. त्यामुळे फास्ट फूडच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती हाेण्याची गरज अाहे. -अॅलिसीया चाँग, एमअायटी