आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरातील समस्यांवर संशाेधकांचे मंथन, ‘इनाेव्हेटिंग फाॅर बिलियन्स’ बूट कॅम्पअंतर्गत उपक्रम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - इनाेव्हेटिंग फाॅर बिलियन्स बूट कॅम्पअंतर्गत सुमारे दीडशे संशाेधक नाशिक शहराचा सखाेल अभ्यास करणार अाहेत. यामध्ये शहराच्या विविध क्षेत्रातील समस्यांचा अभ्यास करून त्यावर उपाययाेजना शाेधल्या जाणार अाहेत. टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेसतर्फे नाशिकमध्ये इनाेव्हेशन सेंटर सुरू करण्यात येणार असून, या पार्श्वभूमीवर टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेस, कुंभथाॅन, एमअायटी मीडिया लॅब अाणि नाशिक डिस्ट्रिक्ट इनाेव्हेशन काैन्सिल यांच्या संयुक्त विद्यमाने ‘इनाेव्हेटिंग फाॅर बिलियन्स’ या बूट कॅम्पचे अायाेजन करण्यात अाले अाहे.
या बूट कॅम्पचे उद्घाटन शनिवारी करण्यात आले. त्यानंतर कॅम्पमध्ये सहभागी झालेल्या संशाेधकांकडून शहराचा सखाेल अभ्यास सुरू झाला अाहे. शहराच्या अाराेग्य, वाहतूक, शिक्षण, कचरा व्यवस्थापन, गुन्हेगारी, पाणी व्यवस्थापन यांसारख्या क्षेत्रात ज्या समस्या पाहायला मिळतात, त्या साेडविण्यासाठी तंत्रज्ञान कशाप्रकारे मदत करू शकते, याच्या संकल्पना काय असाव्यात, या अनुषंगाने संशाेधन करण्यासाठी विद्यार्थी अभ्यास करणार अाहेत. येणाऱ्या विविध समस्यांची माहिती संकलित केली जाणार असून, त्यानंतर शहराच्या विकासासाठी पूरक संकल्पनांचे शेवटच्या दिवशी सादरीकरण केले जाणार अाहे.
इनाेव्हेशन सेंटर मार्चमध्ये
मार्च महिन्यात नाशिकमधील इनाेव्हेशन सेंटर सुरू हाेण्याची शक्यता अाहे. या पार्श्वभूमीवर इनाेव्हेटिंग फाॅर बिलियन्स हा बूट कॅम्प अायाेजित करण्यात अाला अाहे. कॅम्पद्वारे शहराला उद््भवणाऱ्या समस्या जाणून घेण्यात येत अाहेत. त्यानंतर या समस्यांचे विश्लेषण करून समस्या साेडविण्यासाठी संशाेधन केले जाणार अाहे. संदीप शिंदे, समन्वयक,टाटा कन्सल्टंसी सर्व्हिसेस
१३ हजार स्क्वेअर फूटात साकारणार इनाेव्हेशन सेंटर
टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेस(टीसीएस)तर्फे सुरू करण्यात येणारे इनाेव्हेशन सेंटर हे १३ हजार स्क्वेअर फूट जागेत साकारण्यात येणार अाहे. यात कृषी, अाराेग्य, खासगी सार्वजनिक सुरक्षितता, पर्यावरण, पाणी, वीज, दळणवळणाची साधने अादींबाबत संशाेधन केले जाणार अाहे. सेंटर कार्यान्वित झाल्यापासून दर सहा महिन्यांनी शंभर संशाेधकांची टीम या सेंटरमध्ये येऊन संशाेधन करणार अाहे. कार्यकाळ संपल्यानंतर अावश्यक त्या संस्थांमध्ये पुढील संशाेधन कार्य पूर्ण करत त्यावरील उपाययाेजनांची अंमलबजावणी येथे केली जाणार अाहे. त्यासाठी संशाेधकांना दाेन वर्षांचा अवधी दिला जाणार अाहे.
१५० संशाेधकांचा उपक्रमात सहभाग
नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टरमध्ये २३ ते २९ जानेवारीपर्यंत सुरू असलेल्या इनाेव्हेटिंग फाॅर बिलियन्स बूट कॅम्पमध्ये नाशिकसह जयपूर, अहमदाबाद, मुंबई, दिल्ली, हैदराबाद येथील तसेच मेघालय येथील १५० संशाेधकांनी सहभाग नोंदविला असून, येत्या दाेन दिवसांत या संशाेधकांकडून शहरातील विविध क्षेत्रातील माहिती संकलित केली जाणार अाहे.