आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अन्यथा आघाडी सरकारला ‘धनगर’ धडा शिकवतील

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
येवला - धनगर समाजाचा अनुसूचित जमातीच्या यादीत सूची क्रमांक 36 वर स्पष्ट उल्लेख असतानाही राज्य शासनाने समाजाचे घटनात्मक अधिकार हिरावून घेतल्याने धनगर समाजात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत याचे परिणाम आघाडी सरकारला भोगावे लागतील, असा इशारा धनगर समाज आरक्षण समितीचे दत्तात्रय वैद्य यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिला आहे.

शब्दाच्या अपभ्रंशामुळे धनगर ऐवजी धनगड असा उल्लेख केला गेल्याने धनगर समाजावर मोठा अन्याय झाला आहे. १९७२ पासून आजपर्यंत धनगर समाज अनुसूचित जमातीत असल्याचे अनेक सबळ पुरावे आघाडी सरकारला सादर केले. असे असतानाही धनगर समाजाकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात असल्याने, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत धनगर समाजाने आघाडी सरकारवर राग व्यक्त करून महायुतीच्या पारड्यात आपली मते टाकली. आघाडी सरकारने तातडीने धनगर समाजाबाबत सकारात्मक निर्णय न घेतल्यास पारंपरिक मतदार असणारा धनगर समाज दुरावेल व याचे परिणाम विधानसभा निवडणुकीतही दिसून येतील, असे या पत्रकात म्हटले आहे.