आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पालिका निवडणुकीत ६० जागांवर अारक्षण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - सातमहिन्यांवर येऊन ठेपलेल्या महापालिका निवडणुकीसाठी गुरुवारी महाकवी कालिदास कलामंदिर येथे अारक्षण साेडत काढली जाणार असून, अापल्या प्रभागावर काेणते अारक्षण पडते, या भीतीने चिंतित नगरसेवकांची धाकधूक वाढली अाहे. दरम्यान, ३१ प्रभागांत १२२ जागा असून, त्यापैकी ६० जागा राखीव प्रवर्गांसाठी अारक्षित असणार अाहे. ६२ प्रभाग सर्वसाधारण अर्थातच खुले असणार असून, त्यापैकी ३० जागा महिलांसाठी राखीव असणार अाहेत.
मार्च २०१७ मध्ये हाेणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप प्रभागरचना नुकतीच निवडणूक अायाेगाने मान्य केली अाहे. अाता या प्रारूप प्रभागरचना १० अाॅक्टाेबर राेजी जाहीर हाेणार असून, त्यावर हरकतीसाठी २५ अाॅक्टाेबरपर्यंत मुदत असणार अाहे. तत्पूर्वी महापालिकेच्या ३१ प्रभागांतील १२२ जागांसाठी विविध प्रवर्गांचे अारक्षण अाॅक्टाेबर राेजी जाहीर हाेणार अाहे. त्याअनुषंगाने महापालिकेने अारक्षण साेडतीची तयारी सुरू केली अाहे. सद्यस्थितीत १२२ जागांपैकी ६१ जागा महिलांसाठी राखीव असणार अाहेत. जेणेकरून महिलांना ५० टक्के अारक्षणाचा नियम पाळला जाणार अाहे. १२२ पैकी ६२ प्रभाग सर्वसाधारण प्रवर्गासाठी असणार अाहेत. त्यातील ३० प्रभाग महिलांसाठी राखीव असतील. त्यामुळे खुल्या प्रवर्गातून नगरसेवक हाेण्यासाठी ३२ जागाच शिल्लक राहणार अाहेत. अाेबीसींसाठी ३३ जागा असून, त्यात १७ जागा निव्वळ महिलांसाठीच राखीव असतील. १६ जागांवर पुरुष महिला या दाेघांना संधी असेल. अनुसूचित जमातीसाठी जागा असून, पैकी जागांवर निव्वळ महिलांनाच संधी मिळेल. जागांवर पुरुष वा महिलेला उमेदवारी करता येईल. अनुसूचित जातीसाठी १८ जागा असून, त्यात जागा महिलांसाठी राखीव अाहेत. उर्वरित जागांवर स्त्री पुरुष या दाेघांनाही संधी मिळेल.

अशी निघेल साेडत
अाॅक्टाेबर राेजी सकाळी ११ वाजता महाकवी कालिदास कलामंदिर येथे अारक्षण साेडत निघणार अाहे. अनुसूचित जाती-जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग, महिलांसाठी राखीव जागांसाठी साेडत हाेणार अाहे. त्यात नागरिकांना प्रभागाचा स्वतंत्र नकाशा तसेच सर्व प्रभाग दिसतील असे एकत्र नकाशेही बघावयास मिळतील. प्राेजेक्टरद्वारे काेणती जागा अारक्षित झाली, याची माहिती दाखवली जाणार अाहे. प्रथम अनुसूचित जातीसाठी लाेकसंख्येच्या उतरत्या क्रमाने अारक्षण निघेल. अनुसूचित जातीच्या १८ जागांपैकी जागा महिलांसाठी चिठ्ठीपद्धतीने अारक्षित हाेतील. याच पद्धतीने अनुसूचित जमातीच्या जागांपैकी महिलांसाठी राखीव हाेतील.

महापालिकेची अाज रंगीत तालीम
अारक्षणाची साेडत अत्यंत डाेकेदुखी असून, त्यात गडबड झाल्यास पालिकेची बदनामी हाेण्याची भीती असते. लाेकप्रतिनिधी कमालीचे संवेदनशील असल्यामुळे तसेच प्रभाग अारक्षित झाल्यास संभाव्य राजकीय कारकीर्द धाेक्यात येण्याची भीती लक्षात घेत अचूक अारक्षण साेडत जाहीर करण्याचा अायुक्त कृष्णा यांचा प्रयत्न अाहे. या पार्श्वभूमीवर महापालिका बुधवारी अारक्षण साेडतीची रंगीत तालीम घेणार अाहे.

प्रत्येक प्रभागात एक अाेबीसी
महापालिकेच्याएकूण सदस्यसंख्येच्या २७ टक्के जागा अाेबीसी अर्थातच नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव असतील. त्यानुसार ३३ जागा असून, प्रत्येक प्रभागात एक याप्रमाणे ३१ जागांची निश्चिती हाेईल. त्यानंतर उर्वरित दाेन जागा ज्या प्रभागात किमान तीन जागा राखीव नाही तेथे चिठ्ठीद्वारे अारक्षित केल्या जातील. अाेबीसी प्रवर्गात महिलांसाठी अारक्षण काढताना जेथे दाेन जागा अारक्षित अाहे तेथे एक जागा महिलांसाठी दिली जाईल. जेथे अनुसूचित जाती-जमाती किंवा एकाच प्रवर्गातील दाेन जागा महिलांसाठी अारक्षण नसेल तेथे अाेबीसी महिलांचा विचार हाेईल. ज्या प्रभागातील दाेन जागा यापूर्वीच अनुसूचित जाती-जमातीसाठी अारक्षित असतील तेथे अाेबीसी महिलांचे अारक्षण येणार नाही. त्यानंतरही अाेबीसी महिलांच्या शिल्लक जागा अारक्षित करताना उपराेक्त राखीव जागा वगळून अन्य प्रभागात साेडतीद्वारे निश्चित केल्या जातील.
बातम्या आणखी आहेत...