आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Reservation Started For Engineering, Pharmacy Students News In Marathi

इंजिनिअरिग, फार्मसी विद्यार्थ्यांना मिळणार आरक्षणाचा फायदा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मागास प्रवर्ग (इएसबीसी) या नव्या मराठा आरक्षणाची यंदाच्या शैक्षणिक वर्ष 2014-2015 मधील व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे जाहीर करण्यात आल्याने इंजिनिअरिंग व फार्मसीच्या विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे.
यंदाच्या शैक्षणिक वर्षात मराठा आरक्षण लागू होणार की, नाही याबाबत मोठा गोंधळ निर्माण झाला होता. परंतु, व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी नवीन आरक्षणाची अंमलबजावणी करण्याची अधिसूचना तंत्रशिक्षण संचालनालयाने नुकतीच काढली. राज्यात शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मागास प्रवर्ग (इएसबीसी) तयार करून त्यात मराठा समाजाचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाकडून सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाकडे हा निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. त्यानुसार 17 जुलैला उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून आरक्षणाच्या अंमलबजावणीबाबत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. त्याचा फायदा अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र पदवीच्या प्रवेशप्रक्रियेत होणार आहे.
कागदपत्रे सादर करा
आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी अभियांत्रिकी व फार्मसी प्रवेश घेऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांनी विहित मुदतीत जात प्रमाणपत्र व नॉन क्रीमीलेअर प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी त्याचा फायदा घ्यावा. डॉ. दिलीप नंदनवार, सहसंचालक, तंत्रशिक्षण विभाग, नाशिक.
थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी व बी फार्मसी पदवीसाठी आरक्षण लागू