आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बनावट नोटांना आळा घालणार; नाेटांचे नंबर, पासपाेर्ट शिलाई पद्धतीत बदल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकराेड - भारतीय बाजारात बनावट चलन अाणून अर्थव्यवस्था खिळखिळी करण्याच्या वाढत्या प्रकाराला अाळा घालण्यासाठी रिझर्व्ह बंॅकेने नाेटांवर टाकण्यात येणाऱ्या नंबरच्या पध्दतीत बदल करण्याचा निर्णय घेतला अाहे. करन्सी नाेट प्रेस मध्ये सुरू असलेले सध्याच्या नाेटांच्या उत्पादनांचे काम पूर्ण झाल्यानंतर नवीन उत्पादित नाेटांवर या नव्या पद्धतीने नंबरची छपाई केली जाईल. तसेच सक्युरिटी प्रेसमधील पासपाेर्टच्या शिलाईची पद्धतही बदलण्यात येणार अाहे.

करन्सी नाेट प्रेस मध्ये सध्या १, १०, ५०, १००, ५०० व १००० रुपये दराच्या नाेटांचे उत्पादन हाेते. गेल्या वर्षी मिळालेल्या अाॅर्डरनुसार प्रेसमध्ये उत्पादन सुरू अाहे. ते काम पूर्ण झाल्यानंतर नवीन अाॅर्डरनुसार कामाला सुरुवात करतांना त्यावर फाॅन्ट,अाकार,शाई बदलून नव्या पद्धतीने नंबर टाकण्यात येतील. त्याची नक्कल करणे सहजपणे काेणालाही शक्य हाेणार नाही, असे िनयाेजन करण्यात अाले अाहे.

एक रुपयाच्या नाेटेचे उत्पादन १९८८ नंतर बंद करण्यात अाले. त्यानंतर तब्बल २७ वर्षानी या दराच्या नाेटा नव्याने छापण्याचा िनर्णय केंद्र सरकारने घेतला अाहे. तसेच वीस वर्षांनंतर नाशिकराेडच्या नाेट प्रेसवर २० रुपयांच्या नाेटांच्या उत्पादनाची जबाबदारी साेपवण्यात अाली अाहे. सन १९९५ च्या सुमारास येथे त्यांचे उत्पादन हाेत हाेते.
बातम्या आणखी आहेत...