आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Reserve Bank Order To Fired Defective Currency Notes In Nasik

RBI ने छापल्‍या 1000 रुपयांच्‍या 30 कोटी नोटा चुकीच्‍या, आता जाळणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रतीकात्‍मक छायाचित्र - Divya Marathi
प्रतीकात्‍मक छायाचित्र
नाशिक/होशंगाबाद - आरबीआयने 1 हजारांच्‍या तब्‍बल 30 कोटी नोटा सदोष छापल्‍या असून, यातील 20 कोटी रिजर्व बँकेकडे तर उर्वरित 10 कोटी रुपयांच्‍या नोटा या बाजारात आहेत. या प्रकरणी होशंगाबाद आणि नाशिकच्‍या काही कर्मचाऱ्यांना निलंबित करण्‍यात आले. दरम्‍यान, आता या सदोष नोटा जाळून नष्‍ट करण्‍याची तयारी आरबीआय आणि अर्थ मंत्रालयाने केली आहे.
कोणत्‍या सीरीजच्‍या नोटांमध्‍ये आहे गडबड... बँकेकडून किती नोटा परत आल्‍या....
> आरबीआयच्‍या सूत्रांनुसार, 1 हजारांच्‍या 5AG आणि 3AP सीरीजच्‍या नोटा सिल्वर सिक्युरिटी थ्रेडविनाच छापल्‍या गेल्‍या.

> त्‍यांचा करंसी पेपर सुरुवातीला होशंगाबादमध्‍ये सिक्युरिटी प्रिंटिंग आणि मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमधून निघाला.

> नंतर नाशिक येथील आरबीआय प्रेसमध्‍ये पोहोचला.

> आता या सदोष नोटांना परत जमा केले जात आहे.

> रिजर्व बँकेने या नोटा जमा करायला सुरुवात केली आहे.

> आरबीआय आणि अर्थ मंत्रालयाने या नोटांना जाळण्‍याचा निर्णय घेतला आहे.
पुढील स्‍लाइडसवर वाचा, आता तुम्‍ही काय कराल ?