आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘निवासी’चा व्यावसायिक वापर पालिकेच्या रडारवर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शहरातील माेक्याच्या ठिकाणी असलेल्या निवासी वापराच्या मिळकतींचा व्यावसायिक कारणास्तव उपयाेग करताना त्या बदल्यात महापालिकेला मात्र निवासी वापराची घरपट्टी भरून ठेंगा दाखवणारे मिळकतधारक अाता रडारवर अाहेत. त्याचाच एक भाग म्हणून पालिका मुख्यालयासमाेरील पंडित काॅलनी, कॅनडा काॅर्नर, गंगापूर काॅलेजराेड भागातील १०७४ मिळकतींचे गेल्या शुक्रवारी गाेपनीय पद्धतीने सर्वेक्षण करण्यात अाले. या मिळकतींची छाननी करून घरपट्टीत नमूद केल्याप्रमाणे रहिवासाचा वापर हाेताे की नाही, याचा शाेध घेतला जाणार अाहे.
पालिका क्षेत्रात साडेचार लाख मिळकती असून, प्रत्यक्षात घरपट्टी विभागाकडे केवळ साडेतीन लाख मिळकतींचीच नाेंद अाहे. जवळपास लाखाहून अधिक मिळकती नाेंदणीकृतच नसल्याचा संशय तत्कालीन अायुक्त डाॅ. गेडाम यांनी व्यक्त केला हाेता. २००५ मध्ये स्पेस इंडिया नामक संस्थेला नेमक्या मिळकती किती, हे शाेधण्याचे कंत्राट दिले. मात्र, त्यांनी सर्वेक्षण गुंडाळून पळ काढला. दरम्यान, उत्पन्न वाढवण्यासाठी गेडामांनी प्रयत्न केल्यावर घरपट्टीवाढीला विराेध करीत नगरसेवकांनी प्रथम चाेरी शाेधावी, असे अाव्हान दिले हाेते. त्यावेळी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची मदत घेऊन सिडकाेतील शिवाजी चाैक अन्य भागातील मिळकतींचे क्षेत्र अाकारली जाणारी घरपट्टीची पडताळणी केली गेली. त्यात काय अाढळले हे गुलदस्त्यातच हाेते. दरम्यान, २६ अाॅगस्ट राेजी पालिकेने पंडित काॅलनी, काॅलेजराेड, गंगापूरराेड, कॅनडा काॅर्नर, बिग बझार, अशाेक स्तंभ, गाेळे काॅलनी अादी भागातील मिळकतींचे सर्वेक्षण केले. संपूर्ण शहरातील मिळकतींचे सर्वेक्षण करण्यासाठी निविदा काढली असून, त्यांच्याकडेच काम दिले जाणार अाहे. दरम्यान, निवासी क्षेत्राचा व्यावसायिक वापर तूर्तास थांबवणे त्याच्याकडून दंड नियमित व्यावसायिक घरपट्टी अाकारण्यासाठी सर्वेक्षण केल्याचे उपअायुक्त राेहिदास दाेरकुळकर यांनी सांगितले.
अाठवडाभरात हाेणार पर्दाफाश
सर्वेक्षणातइंडेक्स क्रमांक, वापराचा प्रकार, घरमालकाचे नाव, पत्ता सध्याचा वापर याची माहिती घेतली. या कामासाठी पालिकेचे ३० कर्मचारी, २५ लिपिक, निरीक्षक अशा पाच टीम हाेत्या. दरम्यान, या सर्वांचा डाटा एकत्र करून अाठवडाभरात निवासी वापराच्या किती मिळकतींचा व्यावसायिक कारणासाठी वापर हाेताे, याचा पर्दाफाश केला जाईल.
बातम्या आणखी आहेत...