आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नव्या टीडीअार धाेरणाविरुद्ध शहरवासीयांचा अाज महामाेर्चा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - नव्या टीडीअार धाेरणातील अन्याय्य तरतुदींविरुद्ध गुरुवारी (दि. १७) स्थापत्य महासंघाच्या नेतृत्वाखाली महामाेर्चाचे अायाेजन करण्यात अाले अाहे. गाेल्फ क्लब मैदानावरून सकाळी ९.३० वाजता माेर्चाला प्रारंभ होणार असून, ताे जिल्हाधिकारी कार्यालय त्यानंतर महापालिकेवर धडकेल.

केवळ बांधकाम व्यावसायिकच नाही, तर अार्किटेक्ट, सिव्हिल इंजिनिअर्स, कन्सल्टंट्स, त्यांच्या कार्यालयातील कर्मचारी, बांधकाम कामगार बांधकामाशी निगडित विविध व्यावसायिक त्यांचे कर्मचारी सहभागी हाेणार असल्याने हा माेर्चा लक्षवेधी ठरणार अाहे.

नाशिकचा बांधकाम उद्योग आर्थिक मंदीसह विविध समस्यांचा सामना करत आहे. हरित लवादाच्या निर्णयामुळे नोव्हेंबर २०१५ पासून बांधकाम परवानग्या पूर्णत्वाचे दाखले देणे महापालिकेने बंद केले आहे. जानेवारीत राज्य शासनाने जाहीर केलेल्या टीडीआर धोरणामुळे हा उद्योग संकटाच्या खाईत लोटला गेला आहे. हे धोरण शेतकऱ्यांच्याही विरोधातले आहे. याविरुद्ध या क्षेत्रातील सर्व घटकांनी एकत्र येऊन स्थापत्य महासंघाची स्थापना केली. शहराच्या प्रत्येक भागामध्ये कार्यक्रम बैठका घेऊन जनजागृती करण्यात आली. अभियानाला सामान्य नागरिकांचाही पाठिंबा मिळाला. महासंघाच्या आवाहनाला प्रतिसाद मिळून जनहित याचिकेसाठी लोकवर्गणीही जमा झाली. सर्वांपर्यंत हा विषय पोहाेचण्यासाठी होर्डिंगद्वारे माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे.

सर्वसामान्यांपर्यंत टीडीअारचा विषय हरित लवादाच्या निर्णयाची माहिती सविस्तरपणे पोहाेचविण्याच्या दृष्टीने आजवर झालेल्या घडामोडी समजावून सांगण्यासाठी रविवारी बांधकाम क्षेत्रातील निगडित सर्व घटकांचा महामेळावा आयोजित करण्यात आला होता. या मोहिमेला पाठिंबा देण्यासाठी टोल फ्री क्रमांकावर मिस् कॉल देण्याचे आवाहन करण्यात आले होते. संबंधित क्रमांकावर ५२०० पेक्षा जास्त व्यक्तींनी मोहिमेला पाठिंबा दिला आहे. गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असून, राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशाने निर्माण झालेल्या परिस्थितीला जबाबदार असलेल्या महापालिका प्रशासनाविरुद्धच्या आंदोलनांतर्गत नाशिक महापालिकेवरही हा मोर्चा नेण्यात येणार अाहे. हा लढा फक्त संबंधित घटकांचा राहता पूर्ण नाशिककरांचा आहे. त्यासाठी सर्व संघटनांनी नागरिकांनी मोर्चात सहभागी व्हावे, असे अावाहन स्थापत्य महासंघाने केले अाहे.
बातम्या आणखी आहेत...