आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वादग्रस्त उपठेकेदारांची ‘अाराेग्य’मध्ये नाकेबंदी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- महापालिकेतमूळ काम एकाकडे प्रत्यक्षात कामकाज चालवणारा दुसराच, परिणामी काम बंद पाडण्यासारख्या घटना झाल्यावर प्रशासनाच्या हाताबाहेर जाणारी परिस्थिती लक्षात घेता नवनियुक्त अाराेग्याधिकारी डाॅ. विजय डेकाटे यांनी वादग्रस्त उपठेकेदारांची नाकेबंदी करण्याचा प्रयत्न सुरू केला अाहे. त्याचाच एक भाग म्हणून मूळ ठेकेदाराची छायाचित्रासह कुंडलीच जाहीर करून उपठेक्याद्वारे काम करणाऱ्यांचे थेट कंत्राटच रद्द करण्याचा निर्णयही त्यांनी घेतला अाहे.
गेल्या काही िदवसांपासून पालिकेत मूळ ठेकेदार त्यांच्या नावाखाली काम करणाऱ्या उपठेकेदारांमधील मतभेद टाेकाला गेल्याची चर्चा अाहे. हा अनुभव अाराेग्याधिकाऱ्यांनी पंचवटी घंटागाडी ठेक्याप्रकरणी घेतला. येथे ठेकेदाराने उपठेकेदारास काम िदल्यामुळे १४ घंटागाड्यांचे काम बंद राहिले. त्यातून कचरा उचलल्यामुळे नागरिकांचा उद्रेक झाला राेषाला बळी पडलेल्या नगरसेवकांनी अाराेग्य विभागाला धारेवर धरले. मूळ काम घेणाऱ्या ठेकेदाराकडून अाधीच दुसऱ्याकडे उपठेका देण्याचे प्रकार सुरू असून, त्यातही अशा कामांसाठी मुदतवाढी घेण्याचे प्रकार सुरू असल्यामुळे डेकाटे यांनी अाता नवीन धाेरण राबवण्याचा विचार सुरू केला अाहे. यापुढे अाराेग्य विभाग राबवणाऱ्या ठेक्यात ठेकेदाराची विस्तृत माहिती प्रसिद्ध होईल. त्यानंतर संबंधित ठेकेदाराएेवजी दुसरा काम करीत असेल त्याचे पुरावे लाेकांनी सादर केले तर ठेकाच रद्द केला जाईल, असे त्यांनी सांगितले. काम करण्याची क्षमताच नसेल तर अशा ठेकेदारांना महापालिकेमार्फत पाेसले जाणार नाही, अशीही भूमिका त्यांनी मांडली. दरम्यान, घंटागाडी, पेस्ट कंट्राेल, श्वान निर्बीजीकरण अन्य ठेक्यांबाबतही अशीच भूमिका यापुढील काळात घेतली जाणार असल्याचे सांगितले.

वडाळ्याजवळील१० गाेठ्यांना नाेटीस वडाळ्याजवळीलदहा गाेठेचालकांना अाराेग्य विभागाने नाेटिसा बजावून रस्त्यावर शेण, मलमूत्र पसरवल्यास कठाेर कारवाई करण्याचा इशारा िदला अाहे. वडाळा शिवारात गाेठ्यांची संख्या माेठी असून, येथे गाेठ्यांमधून बाहेर पडणारा मलमूत्र अन्य घातक घटक थेट रस्त्यावर साेडण्यात अाल्याच्या तक्रारी हाेत्या. या पार्श्वभूमीवर अाराेग्याधिकारी डाॅ. डेकाटे यांनी माजी उपमहापाैर सतीश कुलकर्णी यांच्यासमवेत संबंधित भागाची पाहणी केली. उघड्यावर मलमूत्र साेडणाऱ्या गाेठेचालकांना समज देण्यात अाली. यापुढे असे प्रकार घडल्यास कडक कारवाईचा इशाराही देण्यात अाला.

प्रभागात ठाेकणार तळ
प्रामुख्यानेस्वच्छतेसंबंधित विषयांवरून अाराेग्य विभाग बदनाम हाेत असल्याने सिंहस्थानंतर सकाळी १० ते दुपारी तीन पर्यंत प्रभागात तळ ठाेकणार असल्याचे डाॅ. डेकाटे यांनी सांगितले. प्रत्येक प्रभागात फिरून येथे तळापर्यंतच्या समस्या जाणून घेतल्या जातील, असेही सांगितले. त्यानंतर कार्यालयीन कामकाजासाठी वेळ दिला जाईल.