आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक: निकालाच्या भीतीने आत्महत्या केलेल्या कौस्तुभला 69 टक्के

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडको: दहावीचा निकाल लागण्याअाधीच तणावाखाली येथ उंटवाडी येथील कौस्तुभ कालिदास मुनडेगकर या विद्यार्थ्याने आत्महत्या केली. मात्र, मंगळवारी लागलेल्या निकालात काैस्तुभला ६९ टक्के गुण मिळाल्याचे स्पष्ट झाले. मात्र, हा आनंदाचा क्षण साजरा करण्यासाठी तो या जगात नसल्याने हळहळ व्यक्त होत आहे. 
 
अभ्यासात हुशार असलेला कौस्तुभ आई-वडिलांचा लाडका होता. दहावीच्या परीक्षेत चांगले गुण अापल्याला मिळतील की नाही याची त्याला चिंता हाेती. त्यामुळे ताे तणावाखाली हाेता. त्यातच सोशल मीडियावर रविवारी दहावीच्या निकालाबाबत संदेश आला आणि तेव्हापासून कौस्तुभने निकालाचा धसका घेतला. रात्री आई-वडील झोपल्यानंतर त्याने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. एकुलता एक मुलगा गेल्याने आई-वडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळला. सेंट फ्रान्सिस शाळेतील शिक्षकांचाही ताे लाडका हाेता. 
बातम्या आणखी आहेत...