आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Result Over Water To Marathwada From Gangapur Dam Today

पाणीवाद : प्राधिकरणाकडे सुनावणी पूर्ण, आज होणार फैसला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - मराठवाड्यास पिण्यासाठी पाणी सोडण्याबाबत न्यायालयाने दिलेल्या आदेशातून गंगापूर धरण वगळावे. सुरु असलेले पाणी विसर्ग त्वरित थांबविण्यात यावा यासह विविध मागण्यांसाठी जलचिंतन संस्था आणि नाशिक पाणीवापर महासंघाने महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरणाकडे दाखल केलेल्या तक्रारीवर गुरुवारी सुनावणी झाली. त्यावर शुक्रवारी निर्णय होणार अाहे.

मराठवाड्यास सोडण्यात येणारे पाणी पिण्यासाठीच वापरण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे. त्यानुसार गंगापूर आणि दाऱणा धरणातून पाणी विसर्ग सुरु झाला आहे. मात्र गंगापूरला यातून वगळावे आणि दारणातूनही केवळ पिण्यासाठी आवश्यक तेवढेच पाणी सोडणे अपेक्षित आहे. त्याबाबत फेरअभ्यास करण्याचे आणि तेवढेच पाणी सोडण्याचे आदेश शासनाला देणे आवश्यक आहे. परंतु तसे झाले नाही. या मागणीसाठीच जलचिंतनचे अध्यक्ष राजेंद्र जाधव यांनी ‘एमडब्ल्यूआरआर’एकडे तक्रार दाखल केली होती.