आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेवानिवृत्त अभियंता अागरकरांची चाैकशी, एलईडी घाेटाळाप्रकरणी अायुक्तांचा प्रस्ताव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - बहुचर्चित एलईडीच्या २०२ काेटी रुपयांच्या ठेक्यातील कथित गैरव्यवहाराप्रकरणी अाता महापालिका अायुक्त डाॅ. प्रवीण गेडाम यांनी सेवानिवृत्त उपअभियंता नारायण गाेपाळराव अागरकर यांची विभागीय चाैकशी करण्याचा निर्णय घेतला अाहे. महासभेच्या मान्यतेसाठी तसा प्रस्तावही ठेवला अाहे. मागील महासभेत खत प्रकल्पातील गैरप्रकारावरून सेवानिवृत्त अभियंता अार. के. पवार यांच्या चाैकशीचा प्रस्ताव बघता अायुक्तांच्या उत्खननात मागील किती अधिकारी सापडतात याची उत्सुकता वाढली अाहे.
पालिकेत गैरप्रकाराशी संबंधित अनेक विषय चर्चेत अाले. प्रत्यक्षात त्यातील अनेक प्रस्ताव कधी हवेत विरून गेले याचा पत्ताही लागला नाही. लाेकप्रतिनिधींच्या साेयीच्या भूमिकेमुळे महासभेच्या व्यासपीठाचाही गैरवापर झाल्याचे दिसून अाले. अाता मात्र, खुद्द अायुक्तांनीच मागील माेठ्या प्रकरणात रस घेऊन कारवाई सुरू केली अाहे. पालिकेत जवळपास पाच वर्षापासून चर्चेत असलेल्या एलईडी घाेटाळ्याशी संबंधित जबाबदारांवर कारवाईसाठी हालचाली सुरू झाल्या अाहेत. सद्यस्थितीत एलईडी प्रकरण न्यायप्रविष्ट असून, ठेकेदाराने नियमानुसार साहित्याचा पुरवठा केल्याने त्याच्याकडील काम काढून घेण्याचा पालिकेचा प्रयत्न अाहे. दुसरीकडे या ठेकेदाराला पाेषक वातावरण निर्माण करण्यात अधिकाऱ्यांचा हात बघता अायुक्तांनी त्या दिशेने चाैकशी केली हाेती. त्यासाठी अायुक्तांनी मुख्य लेखापरीक्षक अधीक्षक अभियंता भुयारी गटार याेजना यांच्यामार्फत २२ जानेवारी २०१५ राेजी एक समिती गठित केली. या समितीने चार महिने एकुणच प्रकरणाची चाैकशी करून १६ मे २०१५ राेजी अायुक्तांना अहवाल सादर केला. त्यात प्रामुख्याने बीअाेटी तत्वावर एलईडी फिटिंग बसवण्यात निविदा प्रक्रियेत, करारनाम्यात तसेच कार्यादेशात त्रुटी अाढळून अाल्या. एकुणच या प्रकरणात अागरकर यांची भूमिका संशयास्पद राहिली. या पार्श्वभूमीवर अागरकर यांनी सकृतदर्शनी पदाचा दुरुपयाेग करीत पालिकेच्या अार्थिक हिताला बाधा पाेहचवून फसवणूक केल्याचा अाक्षेप घेण्यात अाला अाहे. अागरकर यांनी २८ अाॅक्टाेबर २०१३ राेजी ठेकेदाराला कार्यादेश दिला असल्याने घटना घडल्यापासून चार वर्षात विभागीय चाैकशी करण्याचा नियम बघता हा प्रस्ताव ठेवल्याचे स्पष्ट करण्यात अाले अाहे.

कारणे गुलदस्त्यात
अार. के. पवारांच्या चाैकशी प्रस्तावात प्रशासनाने गंभीर मुद्यांकडे लक्ष वेधले हाेते. अागरकरांच्या चाैकशी प्रस्तावात थेट अाक्षेप दर्शविणाऱ्या मुद्यांचा समावेश नाही. त्यामुळे त्यावर पडदा ठेवला का, असाही प्रश्न अाहे. अागरकरांनी निविदाप्रक्रियेत गैरप्रकार केले असे वरवरचे अाक्षेप असले तरी, त्याची प्रकरणनिहाय माहिती नसल्याने महासभेत नगरसेवक त्यावर काय भूमिका घेतात हे बघणे महत्त्वाचे ठरेल.
बातम्या आणखी आहेत...