आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सैन्यात बोगस भरतीप्रकरणी निवृत्त अधिकारी ताब्यात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकरोड - खोटे प्रमाणपत्र सादर करत लष्करात भरती झालेल्या युवकांच्या प्रकरणात मंगळवारी उपनगर पोलिसांनी नोएडा येथून निवृत्त लष्करी अधिकारी सुखप्रीतसिंग अर्जुनसिंग रंधवा याला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी आता एकूण संशयितांची संख्या आठ झाली आहे.
हरियाणासाठी दिल्ली येथे झालेल्या लष्कर भरतीत बलवीर गुजर, सुरेश महांतो, तेजपाल चोपडा आणि सचिन किशनसिंग यांनी खोटे प्रमाणपत्र सादर करून भरती झाले होते. त्यानंतर त्यांनी नाशिकरोडच्या आर्टिलरी सेंटरमध्ये पंधरा दिवसांचे प्रशिक्षणही घेतले. मात्र, प्रशिक्षणा दरम्यान या चौघा प्रशिक्षणार्थींचे प्रमाणपत्र बनावट असल्याचे समोर आल्याने त्यांच्या विरोधात उपनगर पोलिस ठाण्यात ११ जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांच्यासह पोलिसांनी आतापर्यंत एक लष्करी जवान गिरीराज घनश्याम चौहान, राजस्थानमधून टेकचंद सीताराम मेघवाल आणि दिल्ली येथून मदन मानसिंग यांना ताब्यात घेतले होते. मंगळवारी पुन्हा एक संशयित निवृत्त लष्करी अधिकारी सुखप्रीतसिंग अर्जुनसिंग रंधवा याला नोएडा येथून ताब्यात घेतल्याचे पोलिसांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...